शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर द्यावा भर

By admin | Updated: June 16, 2017 00:09 IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत.

पालकमंत्री : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना कृषी साहित्याचे वाटपलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, या उद्देशाने राज्य शासन अनेक कल्याणकारी योजना राबवीत आहेत. कृषी विभागाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकरी हितार्थ योजना राबवून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने कामे करावीत, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ना.पोटे यांच्याद्वारे स्वनिधीतून सोयाबीन बियाणे व रासायनिक खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी,कर्मचारी आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला असून आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी कर्जमाफीच्या निर्णयातून पाच एकर जमिनीचा निकष वगळण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुलभ पीककर्ज वितरणासह प्रभावी सिंचन सुविधाही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आरोग्य, सिंचन, रोजगारासाठी शासनाव्दारे नवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी, याकरिता सुमारे १२ हजार विद्यार्थी दत्तक घेण्यात आले असून त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा खर्च भागविता यावा यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने दरदिवशी पाच रुपयांप्रमाणे वर्षाला १,८०० रुपये जमा करावे, असे भावनिक आवाहन पालकमंत्र्यांनी केले.