शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

बडनेऱ्यात कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

सुरुवातीला जुन्या वस्तीच्या नूर नगरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर नव्या वस्तीच्या कुरेशीनगरात दोन हे सर्व बरे झालेत. त्यानंतर आरपीएफचे पाच जवान पॉझिटिव्ह आलेत. ते सर्व बाहेरगावचे आहेत. त्यांचा शहराशी फारसा संपर्क आला नाही. यापैकी एकाची प्रकृती सुधारली. १० दिवसांत जुन्या वस्तीतील वाटाघाटीच्या व नवीन भागात कोरोना बाधित पाच रुग्ण सापडलेत.

ठळक मुद्देचार कंटेन्मेंट झोन : नवीन भागात संक्रमण चिंताजनक

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : बडनेऱ्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढतीच आहे. चार कंटेनमेंट झोनसह नवीन भागात झालेली एंट्री कोरोनाची धडकी भरविणारी ठरत आहे.सुरुवातीला जुन्या वस्तीच्या नूर नगरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर नव्या वस्तीच्या कुरेशीनगरात दोन हे सर्व बरे झालेत. त्यानंतर आरपीएफचे पाच जवान पॉझिटिव्ह आलेत. ते सर्व बाहेरगावचे आहेत. त्यांचा शहराशी फारसा संपर्क आला नाही. यापैकी एकाची प्रकृती सुधारली. १० दिवसांत जुन्या वस्तीतील वाटाघाटीच्या व नवीन भागात कोरोना बाधित पाच रुग्ण सापडलेत. चावडी चौकात आई व मुलगा, कंपासपुऱ्यात ७० वर्षीय महिला त्याचप्रमाणे येथून जवळच असलेल्या सावता मैदानालगत गुरुवार, ११ जून रोजी आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले. बडनेरा शहरात संक्रमितांची साखळी तुटायचे नावच घेत नसल्याने रुग्णसंख्येत वाढच होत आहे. प्रशासन सातत्याने काळजी घेत आहे. औषधोपचार करीत आहे व नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहे. तेव्हाच बडनेरा या दाटीवाटीच्या शहरातील कोरोना रुग्णांचा प्रसार थांबेल, असे आरोग्य अधिकाऱ्यांचे मत आहे.स्वॅब टेस्टनंतरही मुलांमध्ये वावरसावता मैदानालगत आलेला पॉझिटिव्ह रुग्ण स्वॅब टेस्ट दिल्यानंतर बिनधास्त त्याच्या मित्रांमध्ये बसल्याची चर्चा परिसरात जोरावर आहे. मात्र, त्या सर्वांना स्वॅब नमुने देण्यासाठी पाठविण्यात आल्याची माहिती आहे. लोकांनी समोर यावे, असे आवाहन प्रशासन करीत आहे.चौकाचौकांत बसून असतात जत्थेबडनेऱ्यात चौकाचौकांत तरुणांचे जत्थे दिसतात. पोलिसांना बघून ते पळून जातात. त्यांच्यात फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाही. मास्क कुणी तोंडाला बांधत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या नायनाटासाठी स्वत:हून नियम पाळण्याचे आवाहन आरोग्य अधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या