नव्या बोग्या मिळणार : खासदारांचा रेल्वेकडे पाठपुरावाअमरावती : अमरावती- मुंबई एक्सप्रेसच्या आरक्षणात वाढ तसेच जुने डब्याऐवजी नवे डबे मिळतील, असा निर्णय मध्य रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक आर.डी. शर्मा यांनी घेतला आहे. खा. आनंदराव अडसूळ यांच्या पत्राचा आधार घेत रेल्वे विभागाने आदेश निर्गमित केले आहे. अमरावती- एक्सप्रेस गाडीच्या आरक्षणाचा कोटा वाढविल्यानंतरही आरक्षण कोटा कमी करण्यात आल्याची बाब खा.अडसूळ यांच्या निदर्शनास आली. भुसावळ येथून एसीसी-२ चे २४ बर्थ, एसीसी-३ चे ३३ बर्थ व स्लिपरचे ४० बर्थ आरक्षित ठेवल्यामुळे हा प्रकार अमरावतीकरांवर अन्याय करणारा होता. तसेच भुसावळ येथून तिकीट काढणाऱ्यांना आरक्षित जागा ठेवून अमरावती येथून गाडीमध्ये जागा खाली ठेवली जात होती. त्यामुळे अमरावती-भुसावळदरम्यान रेल्वेचे आर्थिक नुकसान व्हायचे. परंतु रेल्वे बोर्डाच्या नियमानुसार ज्या स्थळावरून गाडी सुटते त्या रेल्वे स्थानकावरून ३५ टक्के आरक्षित कोटा राखून ठेवला जातो. मात्र या नियमावलीला रेल्वे प्रशासनाने बगल देत मुंबई एक्सप्रेसचा कारभार चालविला होता. ही गंभीर बाब मुंबई मध्य रेल्वे विभागाचे क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य सुनील भालेराव, रेल कामगार सेनेचे पदाधिकारी दिवाकर देव यांनी मुख्य वाणिज्य प्रमुख शर्मा यांनी ही बाब लक्षात आणून दिली. तसेच अमरावती गाडीचे डबे बदलविण्याचे आदेश पत्र क्र. सीसीएम कोचींग यांना देण्यात आले आहे. अमरावती गाडीला मुंबई ते इगतपुरीपर्यंत बेस किचन पेन्ट्रीकार लावण्यात यावी आणि अमरावतीहून भुसावळपर्यंत पेन्ट्रीकार लावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असून त्यास तत्वता: मान्यता देण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे. गाडीचे संपूर्ण ना दुरुस्त डबे न बदलविण्यास रेल कामगार सेना मुंबईतच आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल, असा इशारा सुनील भालेराव, दिवाकर देव यांनी दिला होता. परिणामी या आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने नवीन डबे लावले जातील, असे लेखी पत्र दिले आहे. यावेळी रेल्वे कामगार सेनेचे अर्जून जामखडीकर, ज्ञानेश्वर मानवदकर, उमेश नाई, राजा कुऱ्ही, दिलीप पाटील आदी खासदारांच्या आदेशानुसार सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)रेल्वे बोर्डाच्या नियमांना बगल देऊन अमरावती-मुंबई एक्सप्रेसच्या आरक्षण कोट्यात कपात करण्यात आली होती. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आहे. परिणामी आता आरक्षणात वाढ होऊन प्रवाशांना दिलासा मिळेल. तसेच या गाडीला नवीन डबे मिळतील.- आनंदराव अडसूळ,खासदार, अमरावती.
मुंबई एक्सप्रेस आरक्षणात वाढ
By admin | Updated: June 3, 2016 00:14 IST