शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत स्त्री-पुरुष गुणोत्तरात वाढ; अंतिम मतदार यादीत प्रमाण ९४० वरून ९४३ वर पोहोचले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: January 29, 2024 22:00 IST

ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली.

अमरावती : ऑक्टोबर २०२३ मध्ये जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर यादीत ५४ हजार मतदारांची नव्याने नोंदणी झालेली आहे व मृत, स्थलांतरित, दुबार आदी प्रकारांत ४७ हजार मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे अंतिम मतदार यादीत ६६७२ मतदारांची वाढ झाली. यामध्ये ११४७ पुरुष तर ५५११ स्त्री मतदार आहेत. त्यामुळे मतदार यादीत स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण ९४० वरून ९४३ वर पोहोचल्याचे दिसून येते.

निवडणूक आयोगाद्वारा मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम २७ ऑक्टोबर २०२३ ते २३ जानेवारी २०२४ दरम्यान आटोपलेला आहे. अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी झाल्यानंतर वाढीव मतदारांत महिला मतदारांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक विभागाद्वारा सातत्याने मतदार वाढीवर जोर दिल्याने हे शक्य झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाद्वारा कामांची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला महत्त्वाचा टप्पा मतदार यादीचा असतो तो आता आटोपला असल्याने जिल्हा निवडणूक विभागाद्वारा निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी, नोडल अधिकारी यांचे प्रशिक्षण, सर्व सुविधांयुक्त मतदान केंद्र या दुसऱ्या टप्प्याच्या तयारीला वेग आलेला आहे. याबाबत तीनवेळा प्रशिक्षण सत्र आटोपले आहेत व मतदान केंद्रांत आवश्यक त्या सुविधा तयार करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत.वाढीव मतदारांत ११४७ पुरुष तर ५५११ महिला

अंतिम मतदार यादीत ६६६२ मतदारांची वाढ झालेली आहे. यामध्ये ११४७ पुरुष, ५५११ महिला व चार तृतीयपंथीय मतदारांची वाढ झालेली आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या व ‘स्वीप’द्वारे महिला मतदारांमध्ये सातत्याने जागृती करण्यात आलेली आहे. यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९४० वरून ९४३ एवढे झाले आहे.महाविद्यालयांमध्ये शिबिर, सण-उत्सवात विविध उपक्रम, स्पर्धा याशिवाय सातत्याने जनजागृती केल्याने मतदार यादीत महिला मतदारांची मोठ्या प्रकारे नोंद झाली व वाढीव मतदारांत स्त्री-पुरुष गुणोत्तराचे प्रमाण वाढले आहे.-शिवाजीराव शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी