शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

कोविड चाचण्या वाढवा, पालकमंत्र्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 05:00 IST

नववर्षात सारेच भयमुक्त होऊ, असा विश्वास निर्माण करण्याइतपत कोरोनावर नियंत्रण आले असतानाच कोरानाचे म्युटेटेड रूप जगापुढे आल्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोनाचे उत्परिवर्तित रूप मूळ कोरोना विषाणूपेक्षाही ७० टक्के अधिक घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हे जीवघेणे संकट तूर्त परदेशात असले तरी वुहानप्रमाणे ते आपल्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षाही अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे ना. ठाकूर यांनी म्हटले आहे. 

ठळक मुद्दे‘घाबरु नका; दक्ष राहा’, नवे रूप धोकादायक, संसर्गाचा वेग प्रचंड

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ब्रिटेन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचे उत्परिवर्तित रूप आढळून आले. नव्या रूपातील हा विषाणू अत्यंत धोकादायक आहे; तथापि घाबरून न जाता निर्धारपूर्वक दक्षता पाळण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे. मास्क काटेकोरपणे वापरा. कोराना बचावाच्या इतर दक्षतांची अंमलबजावणी करा, असा संदेश नागरिकांना देतानाच प्रशासनालाही कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश त्यांनी मंगळवारी दिले.नववर्षात सारेच भयमुक्त होऊ, असा विश्वास निर्माण करण्याइतपत कोरोनावर नियंत्रण आले असतानाच कोरानाचे म्युटेटेड रूप जगापुढे आल्यामुळे काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. कोरोनाचे उत्परिवर्तित रूप मूळ कोरोना विषाणूपेक्षाही ७० टक्के अधिक घातक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. हे जीवघेणे संकट तूर्त परदेशात असले तरी वुहानप्रमाणे ते आपल्या उंबरठ्यावर उभे आहे. त्यामुळे आता पूर्वीपेक्षाही अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याचे ना. ठाकूर यांनी म्हटले आहे. 

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधांचा पुरेसा साठा ठेवाकोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी परिश्रम घेतले. आता नव्या रूपातील विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. पूर्वीपेक्षाही अधिक श्रम घ्यावे लागतील. आरोग्य यंत्रणेने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा. अलगीकरण-विलगीकरणाच्या सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचारांची आणि चाचण्यांची क्षमता ठेवणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

कॉमार्बिड रुग्णांशी संपर्क करा‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कॉमार्बिड) असलेल्या लोकांची माहिती आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क करावा. त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेतानाच त्यांना सतर्क करण्याचे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी दिले. नागरिकांनीही मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, अनावश्यक गर्दी टाळणे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असे कळकळीचे आवाहन ना. ठाकूर यांनी केले.

कोरोनाचे नवे रूप धोकादायक आहे. परंतु, नागरिकांनी बचावासाठी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्यास कुठल्याही कोरोनाला हरविणे शक्य आहे. महाराष्ट्र शासन सर्व पातळ्यांवर संवेदनशीलपणे जबाबदारी पार पाडत आहेच. पूर्वी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या यंत्रणांना त्याहीपेक्षा सतर्क आणि कार्यतत्पर राहण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. नागरिकांनीही मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे आवर्जून पालन करावे.           - यशोमती ठाकूर, पालकमंत्री 

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याYashomati Thakurयशोमती ठाकूर