निवेदन : जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची मागणीअमरावती : अचलपूर तालुक्यातील बोर्डीनाला धरण कोंडवर्धा या प्रकल्प क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या नेतुत्वात सोमवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाव्दारे के ली आहे.वरील प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात मौजे कोंडवर्धा, ईनायतपूर, बोरगांव मोहना, बेलज,तुळजापूर गढी,फाजलापूर, पिपरी, अमूल्लापूर व अन्य गावामधील शेतकऱ्यांच्या बोर्डी नाला धरणात अन २००८ मध्ये शेती सरळ मार्गाने अल्प किमतीत अधिग्रहित करून खरेदी करीत आहेत.त्यावेळी कोरडवाहू शेतीला एकरी ९० हजार रूपये तर ओलिताचे शेतीला १ लाख ५० हजार रूपये भाव दिला होता.ज्या श्ेतकऱ्यांनी भाव कमी मिळाला आहे. त्यावेळी ही शेती स्वमर्जीने खरेदी करून दिली होती.मात्र काही शेतकऱ्यांनी कमी भावामुळे जमिनीची खरेदी केली नाही. परंतु आता शासनाने याच परीसरातील कोरडवाहू शेतीला चार लाख रूपये तर ओलिताचे शेतीला सहा लाख रूपये भाव दिलेला आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी आहे.
बोर्डीनाला प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला द्या
By admin | Updated: December 22, 2015 00:22 IST