शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी सुरक्षा रक्षकाचे पत्नीसह बेमुदत उपोषण

By admin | Updated: April 20, 2017 00:14 IST

कंत्राटी पद्धतीवर दहा वर्षे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला विज वितरण कंपनीने डावलून दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती केली.

सेवेतून कमी केल्याचे प्रकरण : जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा प्रतापअमरावती : कंत्राटी पद्धतीवर दहा वर्षे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला विज वितरण कंपनीने डावलून दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती केली. कंपनीने केलेली ही नियुक्ती नियमबाह्य आहे. दहा वर्षे काम केल्यामुळे त्या जागी आपणास कायम करावे अशी मागणी करीत स्थानिक सहायक कामगार कल्याण आयुक्त कार्यालयानजीक आदोलनाला राजेश सतीश धुळे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपोषणावर बसले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे येथील विज वितरण कंपनीच्या ३३ केव्हीच्या उपकेंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून २००६ ते २०१६ या कालावधीत काम केले. दरम्यान १ फेब्रुवारी २०१७ पासून त्याला कं पंनीने कामावरून कमी केले व त्या जागी दुसऱ्याची नियुक्ती केली. अचानक कंपनीतून काढल्याने राजेश व त्याच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राजेश धुळे हे येथील उपकेंद्रावर सुरक्षा रक्षक म्हणून कंत्राटी पध्दतीने २००६ ते २० नोव्हेंबर २०१६ पर्यंत कार्यरत होते. या पदावर कार्यरत असतांनाच १ नोव्हेंबर २०१६ रोजी जिल्हा सुरक्षा मंडळाची अमरावती यांनी सुरक्षा रक्षक या पदावर मौजे तिवडी फाटा ३३ के.व्ही. उपकेंद्र उमरखेड येथे कायमस्वरुपी रूजू होण्याचे आदेश देण्यात आले. मंडळाच्या आदेशानुसार राजेश यांनी १ नोव्हेंबर २०१६ ते ३१ जानेवारी २०१७ पर्यंत सदर उपकेंद्रावर काम सुध्दा केले. कुठलीही चुक नसतांना कामावरुन कमी करून त्याऐवजी कंत्राटी सुरक्षा रक्षक एजन्सी मार्फत कार्यरत असलेले गणेश दिंगाबर दोडके यांची नियुक्ती केली आहे. या प्र्रकरणाची चौकशी करून कामावर घ्यावे अशी मागणी राजेशने केली आहे. गणेश दोडके यांची नियुक्ती नियमबाह्यज्या गणेश दिंगाबर दोडके या कंत्राटी सुरक्षा रक्षकाला राजेश धुळे यांना कामावऋन कमी करून त्यांच्य जागेवरनियुक्ती देण्यात आली असून ते नियमबाह्य असून यापुर्वी तो मंडळाच्या कुठल्याही सेवेत नव्हता. यासंदर्भात काही आर्थिक गैरप्रकार झाला असून याप्रकरणाची वरिष्ठांनी चौकशी करावी, व मला न्याय द्यावा अशी मागणी राजेश धुळे या उपोषकर्त्यांनी केली आहे. माझी कुठलीही चुक नसतांना मला अचानक कामावरुन कमी करण्यात आल्यामुळे माझ्या परिवारावर उपासमारीची वेळ आल्याचेही त्याने निवेदनातून सहाय्यक कामगार आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सदर कामगाराला पूर्वी कंत्राटदारानेही कमी केले होते. त्या दरम्यान त्याच्याजागी दुसऱ्या कामगाराला त्याच्या जागी रूजू केले. त्याने मंडळाकडे नोंदणीके ल्याचे कागतपत्रे सादर केले नाही व हजरही राहला नाही. २२त्याला रिलिव्हर म्हणून सेवेत घेण्यास मंडळ तयार आहे. - डि.व्ही. बाकडे, प्रभारी निरीक्षक, जिल्हा सुरक्षा मंडळ अमरावती.