शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसुली

By admin | Updated: August 19, 2015 00:46 IST

थोड्याफार लाभासाठी पोलिसांचे या गँगला छुप्या मार्गाने अभय मिळत गेल्याने त्यांचे धाडस वाढत गेले. ....

अमरावती/अचलपूर :थोड्याफार लाभासाठी पोलिसांचे या गँगला छुप्या मार्गाने अभय मिळत गेल्याने त्यांचे धाडस वाढत गेले. यातील सदस्यांसोबत शहरात दहशत पसरवणाऱ्या कारवाया वाढत गेल्या. या गँगचे सदस्य सट्टा, मटका चालक, अवैध व्यावसायिकांकडून हप्ता वसूल करीत असल्याची चर्चा आता चौकाचौकांत जोर धरू लागली आहे. पोलिसांचेही नसे भयदीड वर्षांपूर्वी सरमसपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या घटनेने गांधी पुलावर दोन समुदायात तणाव निर्माण झाला होता. एका युवकाने बाहेरगावी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीची छेड काढली होती. हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले. त्यावेळी तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अचलपुरात आले होते. सदर युवकाला तत्कालीन पीएसआय मोहन बोरसे यांनी मारहाण केल्याचा आरोप बारूद गँगच्या म्होरक्यांनी करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. याचाच अर्थ छेडखानी करणाऱ्या युवकांना बारूद गँगचे संरक्षण मिळत असे. दरम्यान एका विद्यार्थिनीच्या भ्रमणध्वनीवर एका युवकाने फोन करून अश्लील संभाषण केल्याने चावलमंडी भागात डॉ. कानगोच्या दवाखान्याजवळ रात्री ८ च्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. पण तेथे पीएसआय पद्मशिला तिरपुडे, सुदर्शन झोड, पोलीस कर्मचाऱ्यांसह तत्काळ पोहोचल्याने हे प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात आले होते. यातही बारूद गँगचे सदस्य सहभागी होते. (प्रतिनिधी)महसूल अधिकाऱ्यांचाही सहभागकमी श्रमात भरपूर मोबदला मिळविण्याच्या हेतूने दोन वर्षांपासून बारूद गँगच्या सदस्यांनी महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी संधान साधून रेतीची खुलेआम तस्करी सुरू केली होती. यात काही पोलीस अधिकारीही सहभागी होते. रेती तस्करीतून थोड्याच कालावधीत ते चांगलेच गब्बर झाल्याने त्यातील काहींनी शहरात दहशत पसरवण्याकडे लक्ष केंद्रित केले व त्यातूनच अमित बटाउवाले यांचा खून त्यांनी भरदिवसा केला. बारूद गँगला रेती तस्करीसाठी कोणत्या महसूल अधिकाऱ्याचे पाठबळ होते, याची कसून चौकशी झाल्यास तथ्य उघड होईल. बारुद गँगच्या गुन्हेगारी कारवायांचा सफाया करण्यासाठी जुळ्या नगरीतील तमाम शांतताप्रिय नागरिक एकवटले आहेत. प्रशासन आणि शासनाने लोकभावनेचा आदर करण्याची ही वेळ आहे.