शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जप्ती वसुली मोहिमेतून उत्पन्नात वाढ

By admin | Updated: March 12, 2015 00:59 IST

महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने वेतनाची बोंबाबोंब, कंत्राटदार व पुरवठादारांंची देणी कायम आहे.

अमरावती : महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने वेतनाची बोंबाबोंब, कंत्राटदार व पुरवठादारांंची देणी कायम आहे. तिजोरीत ठणठणाट अशा अवस्थेत मार्च महिण्यात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मात्र उत्पन्नाची आकडेवारी वाढत राहावी, यासाठी थकित मालमत्ता धारकांकडून सक्तीची वसुली करण्यासाठी मालमत्तांना जप्ती लावली जात आहे. मागील २० दिवसांत ८८१ मालमत्ता धारकांना नोटीस बजावून ६७ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.एलबीटीची वसुली फारच माघारल्याने उत्पन्नाचे स्त्रोत आटल्यागत स्थिती महापालिकेची झाली आहे. त्यामुळे आयुक्त अरुण डोंगरे यांनी मालमत्ता वसुलीकडे मोर्चा वळविला आहे. गतवर्षी मालमत्ता वसुलीचे लक्ष्य ४० कोटी रुपये असताना ही वसुली ६० ते ६५ टक्क ्यावर पोहचली आहे. यापुर्वीच्या तुलनेत मालमत्ता कराची वसुली समाधानकारक असली तरी मार्च अखेरपर्यंत ४० कोटींचा पल्ला गाठणे शक्य नाही, असे चित्र आहे. मालमत्ता कर निर्धारित वेळेत भरल्यास विशेष सृट देण्याची मोहिम राबविल्या गेली. एवढेच नव्हे तर ‘कर्मचारी आपल्या दारी’ ही मोहिम राबवून कर वसुली शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अनेक मालमत्ता धारकांनी कराचा भरणा करुन महापालिका प्रशासनाला सहकार्य केले आहे. मात्र जे मालमत्ता धारक वर्षांनुवर्षे कर भरण्यास पुढे येत नाही, त्यांना कायदेशीररित्या कारवाईच्या सामोरे जाण्यासाठी नोटीस, जप्तीची कारवाई करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्यानुसार आयुक्त डोंगरे यांच्या आदेशानुसार पाचही झोनमध्ये जप्ती पथकाद्वारे कारवाई मोहिम सुरु हाती घेण्यात आली आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या मोहिमेतून आतापर्यंत ६७ लाख रुपये तिजोरीत जमा करण्यात आले आहे. पूर्व झोन हमालपुरा वगळता चारही झोनच्या सहायक आयुक्तांनी थकित मालमत्ता कर वसुलीसाठी जप्ती मोहिम सुरु केली आहे. ज्या मालमत्तांकडे मोठ्या स्वरुपाच्या रक्कमा थकित आहेत, अशा मालमत्ता धारकांना नोटीस बजावून निर्धारित कालावधीत ती रक्कम भरुन घेण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही मालमत्ताधारक सहकार्य करण्यास पुढे येत नसल्यास अशा मालमत्तांना टाळे ठोकून त्या ताब्यात घेतल्या जात आहे. निश्चित वेळेत मालमत्ता कराचा भरणा केला नाही तर जप्त केलेली ही मालमत्ता लिलाव करण्याचे अधिकार मुंबई महापालिका अधिनियमानुसार आयुक्तांना आहेत. येत्या काळात केंद्र शासनाच्या इमारतींना कर आकारण्याचे धोरण महापालिकेचे असून त्याअनुषंगाने सर्वेक्षण करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या इमारतींना मालमत्ता कर आकारण्यापुर्वी त्या विभाग प्रमुखांशी करारनामे करण्यासाठी कार्यवाही सुरु झाली आहे. ८ ते १० कोेटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचे संकेत आहे.