शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राज्य दुष्काळमुक्त अभियानात तीन हजार गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:19 IST

संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ पासून या कामांची सुरुवात करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याची माहिती रविवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये भारतीय जैैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी दिली.

ठळक मुद्दे२०१६ पासून सुरुवात : पाणी फाऊंडेशन व जैन संघटनेचा उपक्रम

अमरावती : संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पानी फाऊंडेशन व भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २०१६ पासून या कामांची सुरुवात करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने काम सुरू असल्याची माहिती रविवारी पार पडलेल्या पत्रपरिषदेमध्ये भारतीय जैैन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन यांनी दिली.महाराष्ट्र दुष्काळमुक्त अभियान २०१८ चे जिल्हा समन्वयक प्रदीप जैन, ऋषभ बरडिया, विलास उदापूरकर, सुनील जैन, धर्मेंद्र जैन आदी पत्रपरिषदेला प्रामुख्याने उपस्थित होते. अभियानाच लोकांचाही चांगला सहभाग मिळत असून, ज्या गावात पाण्याची टंचाई आहे, तेथे भविष्यात पाणी अडवून जिरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेसीबी व पोकलॅन उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून ४०० गावांमध्ये कामे करण्यात आली असून, यंदा तीन हजार गावांत कामे करण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्याच्या २४ जिल्ह्यांतील ७५ तालुक्यांत पाच हजार ग्रामपंचायतींमधून आलेल्या प्रत्येकी यामध्ये दोन महिला व तीन पुरुषांनी पानी फाऊंडेशनद्वारा स्थापित प्रशिक्षण केंद्रात सतत चार दिवसांचे जलसंवर्धन प्रशिक्षण प्राप्त केले आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत अभियान सुरू आहे.