शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-हावडा दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनला आग, टाकळी रेल्वे स्थानकावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 22:32 IST

मुंबई-हावडा सुपरफास्ट दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनला बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना बडनेरानजीक टाकळी रेल्वे स्थानकावर घडली.

अमरावती : मुंबई-हावडा सुपरफास्ट दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनला बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना बडनेरानजीक टाकळी रेल्वे स्थानकावर घडली. त्यामुळे प्रवाशांना पाच तास ताटकळत राहावे लागले. टाकळी रेल्वे स्थानकावर फारशा सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल झाल्याची माहिती आहे. रेल्वे सूत्रानुसार, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम रेल्वे स्थानक मुंबई- हावडा दुरंतो एक्स्प्रेसने सोडल्यानंतर बडनेरापासून १० मिनिटे अंतरावर असलेल्या टाकळी रेल्वे स्थानकावर दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामधून धूर निघत असल्याचे सहायक चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर मुख्य चालकाने टाकळी येथे दुरंतो थांबविली. पायलटला विद्युत मोटार जळून खाक झाल्याचे दिसून आले. दुरंतो टाकळी रेल्वे स्थानकावर थांबताच चालक, पायलटने आग विझविण्याचा प्रयत्न केला. टाकळी येथील रेल्वे कर्मचारीदेखील धावून गेले. दरम्यान ही घटना बडनेरा रेल्वे स्थानकावरील अधिकारी, कर्मचाºयांना माहिती पडताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अमरावती येथून अग्निशमन यंत्रणा टाकळी येथे पोहोचली. मात्र, तेथपर्यंत आग नियंत्रणात आली होती. टाकळी रेल्वे स्थानकावर रात्री २ वाजता थांबलेली दुरंतो पाच तासानंतर बडनेराकडे रवाना झाली. 

सेवाग्राम, विदर्भ एक्सप्रेसला विलंबाचा फटकामुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या मागे चालणारी दादर-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस आणि मुंबई - गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला फटका बसला. मूर्तिजापूर, माना रेल्वे स्थानकावर या दोन्ही गाड्यांना थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामधील प्रवाशांचेसुद्धा हाल झाल्याची माहिती आहे.

टॅग्स :railwayरेल्वेAmravatiअमरावती