शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2016 00:05 IST

स्थानिक नगर परिषदेच्या गाळेधारकांनी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून नगर पालिकेसमोर बेमुदत उपोषणाला आंरभ केला आहे.

न.प.चा वाद चव्हाट्यावर : पालकमंत्र्यांना निवेदन अंजनगाव सुर्जी : स्थानिक नगर परिषदेच्या गाळेधारकांनी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून नगर पालिकेसमोर बेमुदत उपोषणाला आंरभ केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री, खासदार, आमदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.२० वर्षांपासून पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्याकाळात न.प.च्या काही अटींवर दुकानंदारांना गाळे वितरित करण्यात आले होते. नियमानुसार पालिकेने हर्रासामध्ये बोली बोलून गाळेधारकांकडून टॅक्स, डिपॉझिट भरून भाडेतत्त्वावर दुकाने दिली होती. सदर दुकानांची मुदत संपल्यानंतर करारनाम्यामध्ये नूतनीकरण करून पुन्हा योग्य ती वाढीव दर लावून दुकान गाळे नूतनीकरण करून द्यावे, या अटीनुसार गाळेधारकांनी पालिकेकडे रीतसर अर्ज करून नूतनीकरणासाठी अर्ज सादर केले. परंतु यामध्ये मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व संबंधित सत्ताधारी नगरसेवकांनी गाळेधारकांचे कोणतेही मत जाणून न घेता केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी ८७+३५ लोकांचा सामुदायिक नूतनीकरणासाठी अर्ज सादर असताना केवळ ज्या ३५ लोकांनी मागणीवरून पैशांची देवाण-घेवाण केली त्या लोकांचे नूतनीकरण करण्यासाठी ठराव घेऊन स्वत: मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी संगनमताने चुकीचा ठराव घेतला. यामधून ८७ लोकांना पूर्णपणे वगळण्यात आले. त्यामुळे उर्वरित गोळधारकांनी याबाबतची तक्रार नगरविकास राज्यमंत्री, पालकमंत्री, आमदार व संबंधित विभागाकडे केली. परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. यामुळे वंचित गळेधारकांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. व्यापारी संघटनेच्या आंदोलनामुळे हा वाद पुन्हा चव्हाट्यावर येणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व त्यांच्या काही नगरसेविकांनी घेतलेल्या ठरावाला बगल देऊन ठरावात चुकीचा बदल करून केवळ ३५ लोकांचा ठराव मंजूर करण्यासाठी सभेसमोर ठेवण्यात आला. या ठरावाला विरोध केला आहे. सुनिता मुरकुटे,नगरसेविका सदरचा ३५ लोकांचा नूतनीकरणाचा ठराव घेतला आहे. परंतु आम्ही आता पूर्ण गाळेधारकांचा नूतनीकरणाचा ठराव घेणार असून उर्वरित गाळेधारकांचे नूतनीकरण करून देणार आहोत, असे लेखी पत्र उपोषनकर्त्यांना आम्ही दिले आहे.संदीप बोरकर,मुख्याधिकारी