अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील सहा प्रसुतांना प्रो व्हिटायमिनचा डोज म्हणून फिनाईल पाजणाऱ्या दोन महिला कर्मचाऱ्यांना कारावास ठोठावण्यात आला. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी गुरूवारी न्यायालयीन निर्णय दिला. बेबी नामदवेराव पेंदाम (३७, एस.टी. स्टँडच्या मागे), शोभा अनिल इंगळे (४०, अशोकनगर) अशी आरोपी महिलांची नावे असून, त्यांना कलम २८४ भादंविमध्ये प्रत्येकी तीन महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व भादंविच्या ३३६ कलमान्वये प्रत्येकी १ महिना सश्रम कारावास व १०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ११ मे २०११ रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात बाळंतपणासाठी भरती झालेल्या सहा महिलांना प्रसूतीनंतर दोघांनी फिनाईल पाजले होते. गाडगेनगर पोलिसांनी दोघींविरुद्ध गुन्हा नोंदवून दोषारोप पत्र सादर केल्यानंतर गुरूवारी न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली.
प्रसुतांना फिनाईल पाजणाऱ्या महिलांना कारावास
By admin | Updated: October 21, 2016 00:21 IST