धक्कादायक : शिक्षण संचालकांकडे तक्रार, शिक्षण विभागात एडीफायचे हस्तक अमरावती : येथील देवी एज्युकेशन सोसायटीच्या कठोरा स्थित एमडीएन- एडीफाय अनधिकृत शाळेच्या चौकशी अहवालातील मुख्य पाने गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेळात आला आहे. येथील शिक्षण उपसंचालकामार्फत शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे पुणे येथील शिक्षण विभागात ‘एडिफाय’चे हस्तक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार अनधिकृत एडीफाय शाळेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे यांनी निष्कर्ष, निरिक्षण आणि शिफारस अशा तीन मुद्द्यांवर चौकशी करुन एडीफाय शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतचा अहवाल वजा शिफारस २४ जून २०१६ रोजी केली होती. या प्रस्तावाची प्रत येथील शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालकाकडे देखील पाठविण्यात आली. मात्र बुधवारी १३ जुलै रोजी पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयात चौकशी केली असता शिक्षण उपसंचालक यांच्याकडून आलेल्या अहवातील पान क्र. १, पान क्र. ४, ५ पान क्र. १७ ए ही अतिशय महत्वाची पाने, दस्ताऐवज हेतुपुरस्पररित्या प्रकरण दडपण्यासाठी गहाळ करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
चौकशी अहवालातील महत्वपूर्ण पाने गायब
By admin | Updated: July 14, 2016 00:17 IST