शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 22:19 IST

धामणगाव रेल्वे येथील अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावून प्रचंड नुकसान केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : धामणगावातील रुग्णालयावर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : धामणगाव रेल्वे येथील अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावून प्रचंड नुकसान केले. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा शाखेच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या घटनेतील हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी गुरुवारी आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. वसंत लुंगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. यावर कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.धामणगाव रेल्वे येथील सकलेचा रुग्णालयात १ नोव्हेंबर रोजी काही असामाजिक तत्त्वांनी अचानक हल्ला करीत रूग्णालयातील हॉस्पिटलची तोडफोड सुरू केली. हॉस्पिटलमधील काचा, खिडक्या फोडल्या. खाटा, कूलर व अन्य साहित्य बाहेर काढून आगीच्या स्वाधीन करण्यात आले. टीव्हीची तोडफोड केली तसेच घराजवळ पार्क केलेली सकलेचा यांची नवी कार व दुचाकीही जाळण्यात आली. हा प्रकारण अतिशय निंदाजनक आहे. त्यामुळे या घटनेतील दोषीवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी आयएमएने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. निवेदन देतेवेळी दिनेश ठाकरे, दिनेश वाघाडे, अमिती देशमुख, राजीव जामठे, गणेश पुंडकर, भरत शहा, अलका कुचे, अनिल रोहनकर, श्याम राठी, नीलिमा ठाकरे, पंकज घुंडीयाल, धीरज मुरके यांच्यासह अन्य डॉक्टर उपस्थित होते.