तळेगाव दशासर : स्थानिक पोलिसांनी रविवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान औरंगाबाद-नागपूर सुपर हायवे वरील तळेगाव देवगाव या मार्गावर पेट्रोलिंग दरम्यान एका संशयित वाहनाची पाहणी केली असता, त्यामध्ये एकूण पाच गाई कोंबलेल्या आढळून आल्या.
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एमएच २८ बीबी ३६२४ या क्रमांकाचे वाहन व पाच गाई असा ५ लाख ५० हजारांचा माल जप्त करून आरोपी सुरेश मनु लखवाळ (४०), भगवान बाबूसवार (३२, दोन्ही राहणार सिंदखेडराजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईत ठाणेदार अजय आखरे यांच्या मार्गदर्शनात सहायक ठाणेदार बिरांजे, सहायक उपनिरीक्षक राठोड, पोलीस नायक मनीष आंधळे, संदेश चव्हाण, मनीष कांबळे, पवन महाजन, व प्रदीप मस्के यांनी केली.