शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सागवान वृक्षांची अवैध कत्तल, दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:02 IST

पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत बिहाली वनवर्तुळात कार्यरत महिला वनरक्षकाला वनतस्कर व त्यांच्या समर्थकांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी बिहालीच्या वनरक्षक कविता भोरे कर्तव्यावर असताना अज्ञात इसमांनी तीन मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. यात तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला.

ठळक मुद्देमहिला वनरक्षकाला जीवे मारण्याचा प्रयत्न : तीन मोटारसायकलवरून केला पाठलाग

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग वनपरिक्षेत्रांतर्गत बिहाली वनवर्तुळात कार्यरत महिला वनरक्षकाला वनतस्कर व त्यांच्या समर्थकांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला.सोमवारी बिहालीच्या वनरक्षक कविता भोरे कर्तव्यावर असताना अज्ञात इसमांनी तीन मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग केला. यात तिला धमकावण्याचाही प्रयत्न केला.जिवाच्या आकांताने भयभित होऊन तेवढ्याच वेगाने आपले वाहन चालवित परतवाडास्थित लॉगींग युनिटमधील सहायक उपवनसंरक्षकांच्या कार्यालयात घाबरलेल्या स्थितीत त्या दाखल झाल्यात. उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना व वन कर्मचाºयांना त्यांची आपबिती सांगितली. यावर वन अधिकाºयांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिलेत. बिहाली वर्तुळात वनरक्षक कविता भोरे गावकºयांसमवेत अवैध वृक्षतोड होत असलेल्या घटनास्थळावर जेव्हा दाखल झाल्या, तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक केली होती. त्यांच्यावर कुºहाडही भिरकावली होती. ही कुºहाड जप्त करून त्यांनी आरोपींची माहिती मिळविली होती. दगडफेक व कुºहाडीचा सामना केल्यानंतर त्यांना या प्रकाराला सामोरे जावे लागले. बिहाली वर्तुळाच्या वनरक्षक कविता भोरे यांनी २७ आॅक्टोबरला सागवान वृक्षांची अवैध वृक्षतोड करणाºयांना घटनास्थळावरून पिटाळून लावले होते. घटनास्थळावरून त्यांनी २ लाख १७ हजारांचा माल जप्त केला. घटनास्थळाचा व मालाचा आणि थुटांचा पंचनामा करून प्रथम वन गुन्ह्याची आपल्या दफ्तरी नोंद केली. पीओआर फाडून आरोपींची माहिती वरिष्ठ वन अधिकाºयांना दिली. यात कोहाना येथील तीन आदिवासींना ताब्यात घेवून जुळ्या नगरीत व ब्राम्हणवाडा थडीत संबंधितांवर धाडीही टाकल्यात.आरोपींची माहिती मागवलीवन तस्करीत गुंतलेल्या आरोपींची माहिती पोलीस विभागाकडून वनाधिकाºयांनी मागवली आहे. तसे पत्र एसडीपीओंना वन अधिकाºयांकडून पाठविण्यात आले आहे. संबंधित वन तस्करांवर यापूर्वी केल्या गेलेल्या कारवाईची माहिती परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडूनही चौकशी अधिकाऱ्यांनी मागवली आहे.सीसीटीव्ही कॅमेरे वाढणारबिहाली वन नाक्यावर तीन नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यापूर्वी एकच सीसीटीव्ही कॅमेरा होता. तोही नादुरूस्त. नाक्यावरून जाणाºया वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश वनाधिकाºयांनी दिले आहेत.नाक्यावरील महिला वनरक्षकांना बदलवून त्या जागी पुरूष वनरक्षक देण्याचा वरिष्ठ वनाधिकारी विचार करीत आहेत. यात पूर्व मेळघाट वन विभागांतर्गत वनरक्षकांची अनेक पद रिक्त आहेत. या रिक्त पदांची अडचण महिला वनरक्षक बदलविताना येत आहे.