चांदूर बाजार : तालुक्यातील शिराजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत अवैध देशी दारू विक्री होत असल्याचे पोलिसांना माहिती मिळताच धाड टाकून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीजवळून १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या इंदिरानगरातील रहिवासी उमेश सहदेव चरपे हा देशी दारूचा धंदा करीत असून, त्याने दारू गोठ्यात लपविल्याची पोलिसांना सूचना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या घरी धाड टाकून झडती घेतली असता, बकरीचा गोठ्यात खड्डा करून दारू लपविल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन १० हजारांची दारू जप्त केली. शिरजगाव कसबा येथे नव्याने रुजू झालेले ठाणेदार पंकज दाभाडे यांनी ही कारवाई केली.