शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2017 00:12 IST

महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर मद्यपींनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : दारूबंदीनंतरची परिस्थिती, नागरिकांचे जीवन विस्कळीत लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : महामार्गावरील दारूबंदीच्या निर्णयानंतर मद्यपींनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात दारूचा महापूर आला असून यामुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. मोर्शी शहरातील हायवेपासून ५०० मीटरच्या आत असलेले दारू व वाईनशॉपच्या दुकानांना सील करून बंद करण्यात आले. या ठिकाणी केवळ पेठपुरा परिसरातील एकच देशी दारूचे दुकान सुरू असल्याने या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची दररोज तोबागर्दी दिसत आहे. मोर्शीलगतच असलेल्या पार्डी गावात अवैध दारू विकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. या ठिकाणी अवैध देशी दारूचा साठा मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने जात असून गावात खुलेआम दारूची विक्री होत आहे. दारू पिणाऱ्यांच्या भीतीमुळे घरातील महिलांना व शाळकरी मुलींना रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झाले आहे. मात्र, पोलीस प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मोर्शी व आजूबाजूच्या खेड्यांतील दारू शौकिनांचे जत्थेच्या जत्थे पार्डी गावात दाखल होऊन येथेच दारू ढोसून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तमाशे करीत असल्याने सामान्य नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पार्डी गावात अवैध देशी दारू साठा कोठून उपलब्ध होत आहे, याचा शोध पोलीस प्रशासनाने घेऊन अवैध देशी दारू विक्रीला त्वरित आळा घालावा, अन्यथा या ठिकाणी मोठा उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. ५५ रुपयांची पावटी १५० रुपयांतटाकरखेडा संभू : महामार्गावरील दारूबंदीमुळे ग्रामीण भागात दारूचा महापूर आला आहे. शहरी भागातील पाऊले ग्रामीणकडे वळत असून या संधीचा फायदा घेत ५५ रुपयांची पावटी थेट शंभर ते १५० रुपयांत विक्री केली जात आहे. गावात लग्न समारंभ असल्यास यापेक्षाही जास्त दराने दारूविक्री होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, दारूबंदी असलेल्या टाकरखेडा संभू, रामा, जळका, हिरापूर, साऊर, आष्टी, पुसदा, वलगाव व कामनापूरमध्ये सर्वाधिक दारू विक्री केली जात आहे. टाकरखेडा संभू परिसरातील पुसदा, साऊर, आष्टी, वलगाव व शिराळा येथील दारूची दुकाने बंद झाल्याने गावात नागरिकांसह महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. परंतु, दारू बंदीनंतर येथे आधीपेक्षाही अधिक अवैध दारू विक्री सुरू झाली. यामुळे गावकरी आणि महिलांमध्ये निराशा व्यक्त होत आहे.