चांदूर रेल्वे पोलीस उपविभागांतर्गत पाच पोलीस ठाणे येतात. एसडीपीओ जाधव यांनी शुक्रवारी त्या पोलीस ठाण्याच्या परिसराची झाडाझडती सुरू केली. यात तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवगाव येथे आरोपी चरणदास चन्ने (४८, रा. मलापूर), कैलास मुंडले (४८, मोहम्मदपूर) हे जुगार खेळताना आढळले. त्यांना रंगेहात पकडण्यात आले. देवगाव चौकात बंडू गणपत इंगोले (३६, देवगाव) हा विनापरवाना दारूची विक्री करीत असताना स्वत: एसडीपीओ जाधव यांनी अटक केली. चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अंतर्गत सोनगाव चौफुलीवर जाधव यांनी नाकाबंदी करून ट्रॅक्टर क्रमांक एमएच २७ बीव्ही ९६९१ या ट्रॅक्टरने नंदू सोनवणे हा अवैधरीत्या रेतीची वाहतूक करीत होता. त्याला अटक करून रेतीसह ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केला. या कारवाईत पोलीस जमादार सुधीर जुमडे, चालक मनोज धोटे, योगेश कडुकार व पवन हे पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
एसडीपीओंची अवैध दारू, जुगारावर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST