शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू विक्रेत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:11 IST

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी पोहरा गावातील अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून एकाला अटक केली. विलास सुरेश ठाकरे (४५ ...

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी पोहरा गावातील अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून एकाला अटक केली. विलास सुरेश ठाकरे (४५ रा. पोहरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार संजय काळे यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून ही कारवाई केली. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने यांनी केला.

0000000000000000000000000000000000000

कारची दुचाकी धडक, दोघे जखमी

अमरावती: भरधाव अज्ञात कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे लहान मुलासह दोघे जखमी झाले. ही घटना गाडगेनगर हद्दीतील पंचवटी चौकाजवळील बाबा कार्नरसमोरील मार्गावर घडली.

मुरलीधर सुंदरलाल अग्रवाल (६१) व रोहीत नामक मुलगा अशी जखमींची नावे आहेत. महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

0000000000000000000000000000000000000

बालाजीनगरात ३० हजाराची घरफोडी

अमरावती : गाडगेनगर हद्दीतील बालाजीनगरात मंगळवारी ३० हजार रुपयांची घरफोडीची घटना उघडकीस आली.

अतुल बाबुराव काळे (३३ रा. महालक्ष्मी अर्पाटन्मेंट, बालाजीनगर) हे ड्युटीवर गेले होते, तर त्यांची पत्नी डी मार्टला खरेदीसाठी गेल्या होत्या. दरम्यान चोरांनी दाराचे कुलुप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख असा एकुण ३० हजाराचा मुद्देमाल लंपास केला. अतुल काळेंच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.

00000000000000000000000000000000

गवळीपुऱ्यातून दुचाकी लंपास

अमरावती: नागपूरी गेट ठाण्याच्या हद्दीतून गवळीपुऱ्यातून एका तरुणाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.

मोहम्मद इरफान मोहम्मद गफ्फुर (३० रा. गवळीपुरा) यांनी एमएच २७ बीएच ६७२४ या क्रमांकाची दुचाकी घरासमोर उभी केली होती. तेथून ती दुचाकी चोराने लंपास केली. मोहम्मद इरफानने या घटनेची तक्रार नागपूरी गेट पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.