शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रेता ठार

By admin | Updated: May 1, 2017 00:04 IST

दारुची अवैध वाहतूक करणाऱ्यांची भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

बेलोरा टी-पॉईन्टवरील घटना : दुचाकी ट्रकवर धडकलीअमरावती : दारुची अवैध वाहतूक करणाऱ्यांची भरधाव दुचाकी ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा टी-पॉईन्टवर घडली. अपघातात संदीप वासुदेव मोहने (३५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून संतोष नारायण डाकोरे (३२, दोन्ही रा. दसरा मैदान) गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शालिग्राम गवई व पोलीस शिपाई प्रेमानंद गाडे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता पोलिसांना घटनास्थळी दारूच्या १० ते १२ बाटल्या आढळून आल्या. संतोष डाकोेरे व त्याचा मित्र दुचाकी क्रमांक एम.एच.२७-ए.व्ही.-५३८३ ने अमरावतीवरून वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील हिंगणवाडी येथे मुलाला घेण्यासाठी जात होते. एक जण गंभीरअमरावती : दुपारी ते बडनेरामार्गे कारंजा लाडकडे भरधाव जात असताना बेलोरा टी-पॉईन्टवर त्यांची दुचाकी विरूद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर धडकली. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला. काही नागरिकांनी दोघांनाही १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत. संदीपच्या दुचाकीवर दारूच्या बाटल्यांचा बॉक्स होता. अपघातामुळे बाटल्या फुटून रस्त्यावर सर्वत्र विखुरल्या होत्या. उपरोक्त दोघेही अवैध दारुविक्रीच्या उद्देशाने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा दारूविक्रीचा बळी असल्यचाची चर्चा होती.