शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सावित्रीबाईंचा आदर्श घेतल्यास समाजाची प्रगती : पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 05:01 IST

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास विभाग व आर.सी.जे.जे. यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत  देशपांडेवाडी येथील शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह  येथे ‘सावित्री उत्सव व कौतुक सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वंदना चौधरी, बाल न्याय मंडळाचे माधव दंडाळे, विभागीय उपआयुक्त अर्चना इंगोले यांच्यासह आर.सी.जे.जे. चे पदाधिकारी उपस्थित होते. 

ठळक मुद्दे‘सावित्रीबाई लेकीं’चा कौतुक सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रत्येक पुरुषाने ज्योतिबा फुले यांचा आणि महिलेने सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेतला, तर स्वतःसह कुटुंबाची व संपूर्ण समाजाची प्रगती निश्चित होईल, असे प्रतिपादन  पालकमंत्री  यशोमती ठाकूर यांनी रविवारी केले.क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास विभाग व आर.सी.जे.जे. यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत  देशपांडेवाडी येथील शासकीय मुलांचे कनिष्ठ बालगृह  येथे ‘सावित्री उत्सव व कौतुक सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष वंदना चौधरी, बाल न्याय मंडळाचे माधव दंडाळे, विभागीय उपआयुक्त अर्चना इंगोले यांच्यासह आर.सी.जे.जे. चे पदाधिकारी उपस्थित होते.  सावित्रीमाई आणि ज्योतिबा होते म्हणून आपण महिला आज विविध क्षेत्रांत आघाडीवर राहून काम करीत आहोत. त्यांच्या कार्यापासून प्रत्येक महिला व पुरुषाने प्रेरणा घेतली, तर संपूर्ण समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या उन्नतीसाठी, शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन, सक्षमीकरण आदींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून राज्यात विविध  योजना व उपक्रम अंमलात आणण्यात आले आहेत. पुढील काळात जिल्हा नियोजनातूनही प्राप्त निधीपैकी तीन टक्के निधी हा महिला व बाल विकासासाठी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे पालकमंत्री म्हणाल्या. विभागीय स्तरावर महिला आयोगाचे कार्यालयसुद्धा लवकरच कार्यान्वित होण्याकरिता शिफारस करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांना व मदतनीस यांना नियमित वेतन अदा करण्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचेही ना. ठाकूर यांनी सांगितले.

गुणवंतांचा यशोमती ठाकुरांच्या हस्ते गौरवकोरोना संकटकाळात अहोरात्र झटणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकीं’ना  गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविकांना स्मृतिचिन्ह देऊन कोरोनायोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेंतर्गत कुटुंबांना स्मृतिचिन्ह, महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले. याशिवाय कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या बालकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचे समाजात पुनर्वसन करण्यात आले असून, त्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुले