शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांचा काळाबाजार केल्यास फौजदारी

By admin | Updated: June 11, 2017 00:09 IST

सर्वसामान्य शेतकऱ्यांना बनावट बियाणे दिल्यास अथवा बियाणे, खताचा काळाबाजार केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश तालुका भरारी पथकाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : सर्वसामान्य शेतकऱ्यांना बनावट बियाणे दिल्यास अथवा बियाणे, खताचा काळाबाजार केल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश तालुका भरारी पथकाने दिले आहेत. यंदा कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषितज्ज्ञांनी व्यक्त केला. विशेषत: यंदा कृषी केंद्रांची तपासणी करण्यासाठी महसूल विभागाची साथ मिळणार आहे़तालुक्यात बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी दरवर्षी कृषी विभागाच्यावतीने भरारी पथकाची निर्मिती करण्यात येते़ तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांच्या नेतृत्वात तीन भरारी पथके नेमण्यात आली आहेत़ दुकानात स्टॉक बोर्ड, बियाणे व खताचा साठा, शेतकऱ्यांना देण्यात येणारी बिले, तसेच गोडावूनची तपासणी करण्यात येणार आहे़ रासायनिक या खताऐवजी शेतकऱ्यांनी नत्र, स्फुरद, पालाश या संयुक्त घटकातील खताचा वापर केल्यास काळाबाजार होणार नाही़ यासाठी शेतकऱ्यांनी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे़ मागील वर्षी तालुक्यात कपाशीचा पेरा अधिक होता़ यंदा कपाशी लागवडीचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषीतज्ज्ञांचे मत आहे़ कपाशी १८ हजार हेक्टरवरून २९ हजार हेक्टरपर्यंत पेरा होणार आहे़ बियाणे वा खताचा काळाबाजार झाल्यास जीवनाश्यक वस्तू कायद्यान्वे कृषी केंद्र सेवा संचालकावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अजय तळेगावकर यांनी दिली़ महसूल विभागाच्या वतीने तालुक्यात तहसीलदार सी़सी़ कोहरे यांच्या नेतृत्वात एक भरारी पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकात मंडल अधिकारी, तलाठी यांची नेमणूक करून एखाद्या शेतकऱ्यांची तालुका प्रशासनाला तक्रार प्राप्त होताच त्याचे निवारण त्वरित करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात येणार आहे़ यासाठी कोहरे यांनी मंडल अधिकारी व तलाठ्यांना गाव पातळीवर निर्देश दिले आहेत़फसवणूक टाळणे गरजेचेबोगस बियाण्यांची विक्री करून प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. यामुळे शेतकऱ्यांची हानी होते. हे नुकसान टाळण्याकरिता आता भरारी पथक कार्य करणार असून बियाण्यांचा काळाबाजार केल्यास थेट फौेजदारी दाखल करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक देखील टळणार आहे.