शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

- तर तो बिबट करू शकतो हल्ला!

By admin | Updated: April 1, 2015 00:22 IST

बिबटाच्या अस्तित्वाने घाबरलेल्या एसआरपीएफ कॅम्प परिसरातील नागरिकांनी सातत्याने आरडाओरड करुन, गोंधळ घालून सुरू केलेला बिबटाचा पाठलाग घातक ठरू शकतो.

वैभव बाबरेकर अमरावतीबिबटाच्या अस्तित्वाने घाबरलेल्या एसआरपीएफ कॅम्प परिसरातील नागरिकांनी सातत्याने आरडाओरड करुन, गोंधळ घालून सुरू केलेला बिबटाचा पाठलाग घातक ठरू शकतो. आतापर्यंत मनुष्यांवर हल्ला न करणारा हा बिबट मनुष्यांचीही शिकार करू शकतो, अशी भिती निर्माण झाली आहे. वनखात्याला असलेली ही भिती त्यांनी अधिकृतपणे व्यक्त केली नसली तरी असे काही घडू नये यासाठी वनखाते चिंतीत आहे. स्वत:ची सक्रीयता वाढवून सामान्य नागरिकांचा हस्तक्षेप कमी करण्याचा हरेक मार्ग अवलंबण्याचा प्रयत्नही ते करीत आहेत. काही दिवसांपूर्वी श्वान आणि वराहांची शिकार करणारा बिबट आता वारंवार त्यांची शिकार करतोय. या माणसाळलेल्या प्राण्यांची शिकार अत्यंत सोपी असल्यामुळे बिबटाला ती आकर्षित करते. बिबटाने चुकून मनुष्यप्राण्याची शिकार केली तर मनुष्याची सोपी शिकारही त्याला भविष्यात आकर्षित करू शकेल, अशी चिंता वन्यजिव अभ्यासकांना आहे. ५०० क्वॉर्टर्स परिसरातील नाल्याजवळ बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे नागरिक धास्तावले आहेत. वनविभागाने परिसरात सात सीसीटीव्ही कॅमेरे व उंच टेकडीवर प्रोटेक्शन कॅम्प लावून बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवूनच आहेत. मात्र, वनविभागाची नजर चुकवित बिबट्यांने तीन ते चार दिवसांत दोन वराह व दोन श्वानांची पुन्हा शिकार केली. सायंकाळच्या सुमारास बिबट शिकारीच्या शोधात परिसरात दाखल होतो. बिबटाविषयी नागरिकांमध्ये धास्ती व उत्सुकताही निर्माण झाली आहे. बिबट आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरते. अनेक जण णकत्र येतात. झुंडीने शोधमोहिम राबवतात. आरडाओरड करतात. अशावेळी बिबटाने शिकार घेवून पलायन केल्याचे स्पष्ट झाले आहे. या कृतीमुळे हिंस्त्र पशु बिबट आक्रमक होऊन रहिवाशांवरही हल्ला करू शकतो, यापासून बहुतांश रहिवासी अनभिज्ञ आहेत. बिबटाने नरभक्षण केल्याचे उदाहरण शहरात नाही. त्यामुळे संयम राखून वनखात्याला मदत केल्यास नागरिक आणि बिबट दोघेही सुरक्षित राहतील.