शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याची मुलगी नि गवंडी कामगाराची पत्नी झाली आयएएस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:00 IST

माधुरी गजभिये यांनी सन २०१९ मध्ये आयएएसची परीक्षा दिली होती. त्या उत्तीर्णदेखील झाल्या होत्या, मात्र, नियुक्तिपत्र आणि प्रशिक्षणाची तारीख येईल तेव्हाच जाहीर करायचे, असा निर्णय घेतला होता, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तेलंगणा येथे ७ मार्चपासून त्यांचे प्रशिक्षणा सुरू होत आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण तळेगाव ठाकूर व बारावी तिवसा येथील देवराव दादा महाविद्यालयातून केली. अमरावती येथील श्री शिवाजी व केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेतले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडून माधुरी गजभिये यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मनात प्रबळ इच्छाशक्ती असली की, कुठल्याही परिस्थितीत ध्येय गाठता येते. हे शब्दश: खरे केले आहे शेतकऱ्याची मुलगी अन् गवंडी कामगाराच्या पत्नीने. माधुरी गजभिये (खोब्रागडे) असे आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या या महिलेचे नाव आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी तळेगाव ठाकूर येथे जाऊन माधुरी गजभिये यांचा सत्कार केला. माधुरी गजभिये यांनी सन २०१९ मध्ये आयएएसची परीक्षा दिली होती. त्या उत्तीर्णदेखील झाल्या होत्या, मात्र, नियुक्तिपत्र आणि प्रशिक्षणाची तारीख येईल तेव्हाच जाहीर करायचे, असा निर्णय घेतला होता, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. तेलंगणा येथे ७ मार्चपासून त्यांचे प्रशिक्षणा सुरू होत आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण तळेगाव ठाकूर व बारावी तिवसा येथील देवराव दादा महाविद्यालयातून केली. अमरावती येथील श्री शिवाजी व केशरबाई लाहोटी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असतानाच सन २०१४ मध्ये टोंगलाबाद (ता. चांदूर रेल्वे) येथील योगेश गजभिये यांच्याशी विवाह झाला. आई सावित्री आणि वडील महेंद्र खोब्रागडे हे दोघेही अल्पभूधारक शेतकरी. त्यांनी मुलीला शिकविले. तो वसा पती योगेश यांनी चालविला. आर्थिक स्थिती बेताची असली तरी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करण्यासाठी लागणारे बळ उभे केले. पुणे येथील ओजेनेक ॲकेडमीकडून ऑनलाईन मार्गदर्शन मिळविले. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार आणि सावित्रीच्या शिक्षणाचा वारसा यामुळे मी कठीण परिस्थितीतून आयएएस होऊ शकले, असे माधुरी गजभिये म्हणाल्या.

‘यशोमतींताईंच्या स्नेहाने भारावले’ : माधुरी गजभियेपालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तळेगाव ठाकूर येथे आई-वडिलांच्या घरी असलेल्या माधुरी गजभिये यांचे कौतुक केले. इतरांना आयएएस होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी स्वतंत्र निधीतून एक अभ्यासिका वजा वाचनालयास आयएएस माधुरी गजभिये हे नाव देण्याचा संकल्प केला. पालकमंत्र्यांनी स्नेहाने मारलेली मिठी ही आयुष्यात कायम स्मरण राहील. एका महिलेचे यश ही महिलाच जाणू शकते, असे माधुरी गजभिये याप्रसंगी म्हणाल्या.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर