शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

‘उपाशीपोटी गेलं वं मायं लेकरू!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:38 IST

शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश पाहून समाजमनही हेलावले.

वैभव बाबरेकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शाळेला उशीर होईल म्हणून वैभव जेवण न करता लवकरच निघून गेला तो न परतण्यासाठी. ‘उपाशी पोटी गेलं वं मायं लेकरू!’ असा हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा आईने फोडला. वडिलांच्याही डोळ्यांत अश्रूंचा ओघ थांबत नव्हता. वैभव गावंडेचे पार्थिव उचलताना नातेवाइकांचा आक्रोश पाहून समाजमनही हेलावले.आर्थिक स्थिती जेमतेम असलेल्या कुटुंबातील वैभव गावंडे याचे वडील हरिदास हे शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आजी, आई-वडील, एक भाऊ व दोन बहिणी असे त्याचे कुटुंबीय. लहानपणापासून लाडत वाढलेल्या वैभव हा शांत व सोज्वळ स्वभावाचा होता. कुटुंबीयांच्या प्रत्येक कामात तोच पुढाकार घेऊन हातभार लावायचा. त्यामुळे कुटुंबीयांचा तो लाडका होता. दररोज घरून जेवण करूनच वैभव शाळेत निघायचा. शुक्रवारी तयारी करीत असताना थोडा उशिरा झाला. स्कूल बस घ्यायला येईल, हॉर्न वाजवेल, या दडपणातून वैभव घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवूनच होता. दहाचा ठोका झाला आणि जेवण न करताच तो घराबाहेर पडला. आईने दाराजवळ आली. जेवण करून जा म्हणून सांगितले. मात्र, उशीर होत असल्याने वैभवने तिचे काही एक ऐकले नाही. स्कूल व्हॅनचा हॉर्न वाजला आणि तो धावत जाऊन वाहनात बसला. हीच माय-लेकराची शेवटची भेट ठरली. वर्गमित्रांसोबत गप्पा करीत तो शाळेत पोहोचला. शाळेतील वर्ग सुरू झाले आणि त्यानंतर मित्रांसह तो पडक्या खोलीत गेला. तेथे भिंत अंगावर कोसळल्याने वैभवाचा मृत्यू झाला.वैभवच्या कुटुंबातील सदस्याला शाळेत नोकरीमृत्युमुखी पडलेला वैभवच्या मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला शाळेत नोकरी देण्याचे आश्वासन याप्रसंगी आ. बच्चू कडू यांनी दिले. मृत वैभव तसेच जखमी मुलांच्या नातेवाइकांना आर्थिक मदत तसेच शाळा व्यवस्थापनातील दोषींनाही निलंबित करण्याचे आश्वासनदेखील आ. कडू यांनी दिले. याशिवाय जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे आ. कडू यांनी सांगितले.काळजाचा तुकडा हिरावल्याने आक्रोशवैभवच्या मृत्यूची वार्ता ऐकताच हरिदास गावंडे हे शेतातील काम सोडून शाळेकडे बेफाम धावत सुटले. घरी असलेली आई, भाऊ व बहिणीदेखील हातातील कामे सोडून शाळेत पोहोचले. वैभवचा मृतदेह पाहून एकच आक्रोश सुरू झाला. हातपाय आपटत हंबरडा फोडणाऱ्या वैभवच्या आईचा आक्रोश पाहून समाजमन हेलावून गेले होते. पत्नी, मुलांचा आक्रोश व रडणे पाहून वडिलांनाही अश्रू अनावर झाले. गावकरी व मित्रमंडळी गावंडे कुटुंबाला धीर देत होते. मात्र, त्यांना आवरणे कठीण होते.