शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

डफरीनमध्ये हय़ुमन मिल्क बँक

By admin | Updated: June 3, 2014 23:42 IST

बाळ-बाळंतिणीला दुधाची कमतरता भासल्यास घाबरण्याचे कारण नाही. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक’ तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधिन आहे. या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरात

शासनाकडे प्रस्ताव विचाराधीन : अधीक्षकांकडून पाठपुरावावैभव बाबरेकर - अमरावतीबाळ-बाळंतिणीला दुधाची कमतरता भासल्यास  घाबरण्याचे कारण नाही. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘ह्युमन मिल्क बँक’ तयार करण्याचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधिन आहे. या प्रस्तावाला शासनाकडून मंजुरात मिळाल्यास ग्रामीण भागातून येथे दाखल होणार्‍या व दुधाची कमतरता जाणवणार्‍या बाळंतणीच्या बाळाला मातेच्या दुधाची चव आणि पौष्टिक दूध मिळणार आहे. महाराष्ट्रात पुणे येथे ससून हॉस्पिटल व मुंबई येथे सायन हॉस्पिटल या दोन ठिकाणी  ‘ह्युमन मिल्क बॅक’ आहे. विदर्भात येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ही बँक सुरु व्हावी यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक अरुण यादव यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून या प्रस्तावाला मंजुरात मिळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या प्रसुत महिलांमध्ये दुधात कमतरता आहे तसेच काही बालकांच्या माता प्रसूतीदरम्यान दगावतात, अशांसाठी ‘ह्युमन मिल्क बँके’तील दूध उपयोगी पडणार आहे. जिल्ह्यातील अनेक महिला प्रसूतीनंतर आपल्या बाळांना दूध पाजण्यापासून वंचित राहत आहे. तसेच अनेक बाळांच्या माता प्रसूतीदरम्यान दगावल्या आहेत. अशा शेकडो माता व बाळांना ह्युमन मिल्क बॅकेचा मोठा आधार मिळणार आहे. ही बँॅक लवकरच सुरु करण्यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अरुण यादव यांनी पाठपुरावा सुरु केला आहे.  विदर्भातील महिलांकरिता ही बँके महत्त्वाची व उपयुक्त ठरणार आहे.  ही बॅक सुरु झाल्यास दुध पाश्‍चराईज्ड करणारी मशीन रुग्णालयाला मिळणार आहे. त्यामुळे  विदर्भातील बालमृत्यूचे प्रमाणही घटणार आहे.