महापालिका : आणखी चार कामगारांवर गंडांतरअमरावती : शहर स्वच्छतेत हयगय करणाऱ्या बिटप्युनसह ३ स्वच्छता कामगारांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत आयुक्त हेमंत पवार यांनी शनिवारी निलंबन आदेश पारित केलेत. निलंबितांमध्ये गवळीपुरा येथील प्रभारी बिटप्युन संदीप दीपक गोहर ,शारदा दयाराम सोनटक्के, चिमन इतवारी गोहर आणि कल्पना गोपाल ढेणवाल या स्वच्छता कामगारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक ३८ अकोली साईनगरमध्ये या तीन स्वच्छता कामगार कार्यरत होत्या. १ मार्चला वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांनी अकोली साईनगर व गवळीपुरा प्रभागातील स्वच्छतेची पाहणी केली. त्यावेळी वरील तीनही स्वच्छता कामगार गैरहजर असल्याचे आढळून आले. त्याअनुषंगाने सोनटक्के, ढेणवाल आणि गोहर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले.तर संदीप गोहर हे २१ ते २६ फेब्रुवारी व २८ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत सुटीचा अर्ज न देता अनधिकृतपणे गैरहजर होते. ४ कामगारांच्या निलंबनाचा प्रस्तावअमरावती : त्यामुळे त्यांच्या अनधिकृत रजेचा कालावधीत कामगारांची हजेरी घेण्यास अडचण निर्माण झाली. याशिवाय गोहर यांना वैयक्तिक शौचालये जिओ टँगिंगचे काम सोपविले होते. मात्र, त्यांनी त्याबाबत कुठलाही अहवाल दिला नाही. ही बाब कार्यालयीन शिस्तीच्या विरुद्ध व गंभीर स्वरुपाची असल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचा आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी काढला. प्रभाग क्र २६ गवळीपुरा येथील जया शाम संकत, पद्मा ईश्वर कलोसे, अनिता पुनम सारवान आणि शांता छोटेलाल सिरसिया या चार स्वच्छता कामगारांना निलंबित करण्यात येणार आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी सीमा नेताम यांनी १ मार्चला या प्रभागात भेट दिली असता वरील चारही कामगार गैरहजर आढळून आले होते. उद्या मंगळवारी त्यांचा निलंबन आदेश निघेल. (प्रतिनिधी)आदेशाची अवमाननासंदीप दीपक गोहर या प्रभारी बिटप्युनला ४ मार्च आयुक्तांनी निलंबित केले; तथापि सोमवारी संदीप गोहर याने अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी त्याला कामावर परत रुजू होण्याचे मौखिक आदेश दिले. यासाठी ओडीएफच्या डेडलाईनची टेकू धेण्यात आला. एकप्रकारे आयुक्तांच्या निलंबन आदेशाची अवमानना करण्यात आली.
स्वच्छतेत हयगय, चपराशासह चार निलंबित
By admin | Updated: March 7, 2017 00:16 IST