शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पळसोना येथे पत्नीकडून पतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:23 IST

बेनोडा (शहीद) : नजीकच्या पळसोना गावात मद्यपी पत्नीने मद्याधीन पतीवर काठीचा प्रहार केला. डोक्यावर मार लागल्याने त्याचा झोपेतच मृत्यू ...

बेनोडा (शहीद) : नजीकच्या पळसोना गावात मद्यपी पत्नीने मद्याधीन पतीवर काठीचा प्रहार केला. डोक्यावर मार लागल्याने त्याचा झोपेतच मृत्यू झाला. हत्येची ही घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी उजेडात आली.

पोलीस सूत्रांनुसार, दसरी साहेबराव उईके (४३, रा. पळसोना) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. साहेबराव गोमाजी उईके (४८) असे मृत पतीचे नाव आहे. त्या दोघांनाही दारुचे व्यसन होते. दोघेही शेतमजुरी करायचे व सोबतच मद्यपान करायचे. त्यातून नेहमीच त्यांच्यात कलगीतुरा उडत असल्याचे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले.

१६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास मद्यपानानंतर त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोघेही एकमेकांना मारत होते. शेजा०यांनी नेहमीप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. दसरीने काठीने साहेबराववर प्रहार केले. काही वेळाने वाद मिटला व दोघेही झोपी गेले. सकाळी साहेबराव उठत नव्हता. त्याचा झोपेतच मृत्यू झाला. काठीचे प्रहार डोक्यावर लागल्याने झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. घटनेची माहिती मिळताच बेनोड्याचे ठाणेदार मिलिंद सरकटे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

प्राथमिक माहितीवरून दसरीविरुद्ध भादंविचे कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मिलिंद सरकटे, हेडकॉन्स्टेबल अनिल भोसले, सुदाम साबळे, दिवाकर वाघमारे, गजानन कडू, सचिन भोसले, मंदा सावरकर, उत्तरा पांडे करीत आहेत.

---------

शेजा०यांसाठी नेहमीचेच भांडण

उईके दाम्पत्याचा विवाह १६ वर्षांपूर्वी झाला. त्यांना १४ व १२ वर्षांच्या दोन मुली आहेत. ते दोघेही सोबत कामावर जायचे आणि सोबतच दारू ढोसायचे. त्यातून त्यांचे वादही व्हायचे. मात्र, दररोजच्या या पती-पत्नीच्या वादात कुणी हस्तक्षेप करीत नव्हते.