शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने घेतला गळफास पतीची विहिरीत उडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 23:34 IST

दाम्पत्यात उद्भवलेल्या वादात पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे शुक्रवारी घडली. पत्नीने स्वत:ला गळफास लावल्यानंतर पतीने विहिरीत उडी घेतल्याची माहिती मंगरूळ दस्तगीर पोलिसांना प्राप्त झाली; मात्र तो सापडत नसल्याने त्याचा शोध मंगरूळ पोलीस करीत आहेत. या आत्महत्येने व अचानक पती बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकौटुंबिक वाद : पोलिसांकडून पतीचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : दाम्पत्यात उद्भवलेल्या वादात पत्नीने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील निंभोरा बोडखा येथे शुक्रवारी घडली. पत्नीने स्वत:ला गळफास लावल्यानंतर पतीने विहिरीत उडी घेतल्याची माहिती मंगरूळ दस्तगीर पोलिसांना प्राप्त झाली; मात्र तो सापडत नसल्याने त्याचा शोध मंगरूळ पोलीस करीत आहेत. या आत्महत्येने व अचानक पती बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.तालुक्यातील निंभोरा बोडखा येथील सुनीता संजय दाभाडे (३५) हिने २० वर्षांपूर्वी गावातीलच संजय दाभाडे (४२) याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. शेती व मोलमजुरी करून आठवी व अकरावीत शिकत असलेल्या प्रतीक व कार्तिक या दोन मुलांसह हे दोघे गावातच राहात होते. काही काळापासून त्यांच्यात वाद झडत होता. सुनीताचे माहेर गावातील असल्याने गुरुवारी ती तेथे गेली. यानंतर तिला मारहाण करीत संजयने घरी आणले. या वादातूनच ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज ठाणेदार विवेकानंद राऊत यांनी व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास सुनीताने स्वत:ला गळफास लावून घेतल्याची बातमी गावात पसरली. घटनेची माहिती मिळताच सुनीताचा भाऊ अंकुश भीमराव डोंगरे (२६) हा घटनास्थळी पोहचला. सुनीताने घराच्या आतील लाकडी मायलीला सुती दोराने गळफास घेतला, तर जावई संजय हा दुसऱ्या खोलीत रडत बसल्याचे त्याने पाहिले. वादविवादातून ही घटना घडल्याच्या संशयावरून अंकुशने मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे गाठले. त्याच्या फिर्यादीवरून मर्ग दाखल करण्यात आला. दरम्यान, संजयने पोलीस पाटील विशाल बांते यांना माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी त्याला जवळच्या विहिरीकडे धाव घेताना पाहिले. काही अंतरावर त्याच्या चपला होत्या. संजयने त्यात उडी घेतल्याच्या संशयावरून मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी पाणी उपसून त्याचा शोध घेणे सुरू केले. मात्र, अद्यापही संजय वा त्याचा मृतदेह त्यांना गवसला नाही. सुनीताने केलेली आत्महत्या की हत्या, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुढील तपासात मंगरूळ पोलीस करीत आहेत.