शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पादचारी वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकले, चेनस्नॅचर्स पुन्हा सक्रिय

By admin | Updated: March 22, 2017 00:11 IST

स्थानिक शारदनगरात वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. दोन दिवसांतील ही दुसरी घटना असून

अमरावती : स्थानिक शारदनगरात वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. दोन दिवसांतील ही दुसरी घटना असून शहरात पुन्हा ‘चेनस्नॅचर्स’ सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी वृद्धेला मंगळसूत्र हिसकावताना जोरदार धक्का दिल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. शारदानगरातील रहिवासी मालती मधुकर पुऱ्हेकर (७६) या सकाळी नारायणगुरू महाराजांच्या भक्तांद्वारे गणेश कॉलनीत आयोजित यज्ञाचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरूणांनी पुऱ्हेकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. मालतीबार्इंनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांनी याघटनेची माहिती कुटुंबियांना दिल्यावर राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी मालती पुऱ्हेकर यांना तत्काळ इर्विनमध्ये वैद्यकीय तपासणीकरिता नेले. राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूद्ध कलम ३९२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलीस शारदानगरातील व्यापारी प्रतिष्ठाने, घराच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत. (प्रतिनिधी)२४ तासांतील दुसरी घटनाशहरात काही महिन्यांपूर्वी चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. आता पुन्हा सोनसाखळीचोर सक्रिय झाल्याचे २४ तासांत घडलेल्या घटनांवरून लक्षात येते. सोमवारी सायंकाळी राजकमल चौकानजीक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले होते. काही नागरिकांनी आरोपी दिलीप मधुकर एकुनकर (३०,रा. वरद, राळेगाव, जि.यवतमाळ) याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. दुसरी घटना मंगळवारी शारदानगरात घडली आहे.