शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो वारकऱ्यांचे पंढरपूरकडे कूच

By admin | Updated: June 29, 2017 00:24 IST

पुंडलिक वरदे..हरी विठ्ठलच्या गजरात तब्बल १९५ वारकरी पहिल्या विशेष रेल्वेने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून बुधवारी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले.

पहिली विशेष रेल्वे रवाना : विठू नामाचा गजर, भक्तांचा उत्साह लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पुंडलिक वरदे..हरी विठ्ठलच्या गजरात तब्बल १९५ वारकरी पहिल्या विशेष रेल्वेने नया अमरावती रेल्वे स्थानकावरून बुधवारी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे रवाना झाले. विठुरायाच्या दर्शनाच्या अनामिक ओढीने धुंद झालेल्या वारकऱ्यांच्या उत्साहामुळे परिसरात देखील चैतन्य निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी विशेष रेल्वे सुरू करण्याची घोषणा रेल्वे विभागाने केली होती. त्यानुसार मध्य रेल्वे विभागाने पंढरपूर रेल्वे विशेष गाडी विठ्ठल भक्तांसाठी सुरू केली आहे. नया अकोला येथून बुधवारी रेल्वे बडनेरा सीसीआय एस.सी. सयाम यांच्या हस्ते या विशेष रेल्वेला सुरूवात करण्यात आली. गुरूवार २९ जून रोजी दुसऱ्या रेल्वेला दुपारी दोन वाजता महापालिका स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना केले जाईल. पंढरपूरकडे आज रवाना झालेल्या गाडीचे चालक म्हणून एस.वाय.कोहाडे तर सहचालक म्हणून एन. चंद्रा होते. गाडीचे गार्ड उमेश राम होते. पंढरपूरकडे रवाना झालेल्या विशेष गाडीसाठी पहिल्या दिवशी १५४ तिकिटांची विक्री करण्यात आली असून १९५ प्रवासी रवाना झाल्याची नोंद आहे. पहिल्या दिवशी २९ हजार ३० रुपयांचे तिकिट विक्रीतून उत्पन्न मिळाले आहे. नया अमरावती रेल्वे स्थानकाहून गुरूवार २९ जून त्यानंतर १, वन२ जुलै रोजी दुपारी २ वाजता विशेष रेल्वे पंढरपूरकडे रवाना होईल. पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन २९, ३० जून तर १ व २ जुलै रोजी १० वाजून ४० मिनिटांनी ही गाडी अमरावतीसाठी परतीचा प्रवास करेल. पंढरपूर विशेष रेल्वे गाडीला बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदूरा, मलकापूर, बोदवड, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, खामगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, भिगाव, जेजूर, खुर्दवाडी, पंढरपूर असे थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी २० डब्यांची असून यात १८ डबे सामान्य व आरक्षण तर दोन डबे एसएलआरचे आहेत.आज सुटणार दुसरी विशेष गाडीविठ्ठलभक्तांना घेऊन उद्या गुरूवारी दुपारी दोन वाजता दुसरी विशेष रेल्वे रवाना होणार आहे. आरक्षण व विनाआरक्षण अशी रेल्वे गाडीत सोय आहे. वारकऱ्यांसाठीच ही रेल्वे सुरु करण्यात आली आहे. रेल्वेने प्रवास करताना तिकिट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन बडनेरा सीसीआय एस.सी. सयाम यांनी केले आहे.