शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

हजारो अनुयायांची साश्रूनयनांनी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:01 IST

विदर्भातील संतपरंपरेत आपले आगळे स्थान निर्माण करणारे संत अच्युत महाराज यांचा पाचवा पुण्यतिथी महोत्सव मंगळवारी तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे आयोजित करण्यात आला.

ठळक मुद्देसंत अच्युत महाराज पुण्यतिथी महोत्सव

रोशन कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : विदर्भातील संतपरंपरेत आपले आगळे स्थान निर्माण करणारे संत अच्युत महाराज यांचा पाचवा पुण्यतिथी महोत्सव मंगळवारी तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे आयोजित करण्यात आला. यावेळी अच्युत महाराजांच्या हजारो अनुयायांनी साश्रुनयनांनी मौन श्रद्धांजली अर्पण केली.संत अच्युत महाराजांच्या पाचव्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी शेंदूरजना बाजार येथे सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली. शकडो किमी अंतरावरून आलेल्या महाराजांच्या अनुयायांनी गर्दीने संपूर्ण परिसर फुलला होता. सकाळी दहा वाजता पुण्यतिथी कार्यक्रमाला सुरूवात झाली. महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत हरिनाम जप सहित संगीतमय गीते अर्पण करून सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. समाधी स्थळाव्यतिरिक्त गावात ठीकठिकाणी भाविकांनी अच्युत महाराजांचा फोटो ठेवून पूजन केले. सर्व गाव स्वच्छ करून श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी संत भानुदास महाराज, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्धनपंत बोथे, सुधीर दिवे, अनिल सावरकर, पासेबंद साहेब, सचिनदेव महाराज, अनंत धर्माळे, किशोर सावरकर, शाम गडकरी, रायजीप्रभू शेलोटकर, भगीरथ मालधुरे, लता देवते, सरपंच सागर बोडखे, युवराज भोजने, मनोहर निमकर, वामनराव भोजने, विजय देवळे, विवेक सावरकर यांच्यासह त्यांचे निकटवर्ती अनुयायी उपस्थित होते.महाराजांचे विचार कालातीतसंपूर्ण विदर्भात पसरलेले संत अच्युत महाराजांचे अनुयायी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त एकत्र आले होते. महाराजांचे अनुयायी त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार आजही करीत आहेत. यामुळे त्यांच्या अनुयायांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराजांचे विचार कालातीत आहेत, असे महाराजांच्या अनुयायांनी सांगितले.