शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

पंढरी मध्यम प्रकल्पावर शेकडो प्रकल्पग्रस्तांचे अन्न-जलत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:17 IST

पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकांनी जाहीर केले. या आंदोलनाने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा होत आहे.

ठळक मुद्देदुपारपर्यंत अल्टिमेटम : मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्यास जलसमाधी

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड/पुसला : पंढरी मध्यम प्रकल्प, दाभी प्रकल्पग्रस्तांनी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात पंढरी मध्यम प्रकल्पावर शुक्रवारपासून अन्न-जलत्याग आंदोलन सुरू केले. मुख्यमंत्र्यांनी प्रकल्पस्थळी येऊन मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजता जलसमाधी घेणार असल्याचे आंदोलनकांनी जाहीर केले. या आंदोलनाने भाजपाला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा होत आहे.१२ वर्षांपासून अपूर्ण प्रकल्प पूर्ण व्हावा, शेतकऱ्यांना नवीन दरानुसार फरकाची रक्कम, मोबदला तातडीने अदा करावा, स्थानिक मच्छीमार संस्था निर्माण करण्याची परवानगी भोई समाजाला द्यावी, प्रकल्पग्रस्त दाखला परत घेऊन १० लाख रोख द्यावे, खापरखेडा पुनर्वसनकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी आदी मागण्या आंदोलकांनी मांडल्या. शुक्रवारी सकाळी ९ पासून विजय श्रीराव यांच्या नेतृत्वात अन्न-जलत्याग आंदोलनास प्रारंभ झाला. १३ आॅक्टोबरला दुपारी ४ वाजेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आंदोलनस्थळी येऊन मागण्या मंजूर कराव्या, अन्यथा कोणत्याही क्षणी शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आंदोलनाला काँग्रेससह अन्य संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. शेंदूरजनाघाट ठाणेदार शेषराव नितनवरे यांनी शेकडो पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.भाजपचे विजय श्रीराव, प्रभाकर काळे, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव विक्रम ठाकरे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, पुसला ग्रामपंचायत सरपंच सारिका चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे, गजानन डाहाके, भाजपचे इंद्रभूषण सोंडे, स्वप्निल मांडळे, धनराज तडस, सुभाष डोंगरे, चंद्रशेखर ढोरे, नरेंद्र कुरवाळे, राजू बागडे, मोतीराम ताटस्कर, अजाब राहुरकर, सुधाकर पाटील, विलास पवार, नितीन ढोरे, दानाजी फरकाडे, लीलाधर खराळकर, मनोज डोंगरे, सरंपच जानराव उईके, अजाब बोदड, सकू धुर्वे, प्रशांत अजमिरे, राजेंद्र राजूरकर, बाबाराव डहाके, राजू वरूडकर, गणेश वानखडे, गजानन कुरवाळेसह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, प्रकल्पस्थळी जमाव पाहून अधिकाºयांनी ऐनवेळी मशिन बाहेर काढून कामाचा देखावा केल्याची चर्चा होती.