शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दीडशे पुरावे तरीही आरक्षणापासून वंचित !

By admin | Updated: September 22, 2016 00:19 IST

आज केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकात ६९ टक्के, आंध्रप्रदेश व राजस्थानात ६५ टक्के, फक्त महाराष्ट्रात ५२ टक््के अशी आरक्षणाची राज्याची स्थिती आहे़...

८२ टक्के मराठ्यांची उपजिवीका शेतीवरच : साडेतीन हजार पैकी तीन हजार आत्महत्या मराठा शेतकऱ्यांच्यामोहन राऊत धामणगाव रेल्वेआज केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकात ६९ टक्के, आंध्रप्रदेश व राजस्थानात ६५ टक्के, फक्त महाराष्ट्रात ५२ टक््के अशी आरक्षणाची राज्याची स्थिती आहे़ तब्बल दिडशे पुरावे देवूनही मराठा समाजाला आरक्षणापासून दुर ठेवण्यात येत असल्यामुळे राज्यात मागील १५ वर्षात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नापीकी मुळे झाल्या़ त्यात साडेतीन हजारा पैकी तीन ह जार मराठा कुणबी बांधवांची असून आजही ८० टक््के हा समाज शेतीच्या उपजिवीकेवर अवलंबून आहे़ अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेच्या निमीत्याने राज्यभरातील मराठा अन्यायाविरूध्द पेटला आहे़अ‍ॅट्रासिटी कायद्यातील बदल आणी स्वामिनाथन आयोग लागू करणे या नेहमीच्या मागण्याशिवाय चित्रपट व नटाकातून समाजाची बदनामी थांबवा मराठा समाजाला आरक्षण घोषीत करावे या विविध मागण्यासाठी आज अमरावतीत मराठी क्रांती मोर्चा निघणार आहे़ मराठा आरक्षण संदर्भात या समाजाची न्यायालयीन लढाई सूरू आहे़ गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून शासन प्रयत्न करीत असल्याचे सरकार आपली भुमिका मांडते़ परंतू या समाजाला आरक्षणापासून किती दिवस वंचित ठेवणार असा प्रश्न निर्माण होत आहे़महाराष्ट्रात ५२ टक्के आरक्षण आहे़ इतर राज्यात यापेक्षा अधीक आहे़ राजकीय सत्तेत मराठा समाजाचे अधीक प्रतीनिधी असले तरी ग्रामीण भागात आज या समाजाची स्थिती अत्यंत हलाखीची आहे़ अ‍ॅट्रासिटी कायद्यांतर्गत खोट्या तक्रारी करून सर्वाधिक गुन्हे दाखल करण्याचा प्रकार वाढल्याने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा व्हावी, त्यात अटकपूर्व जामिनाची तरतूद व्हावी, ९५ टक्के प्रकरणातील खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद होणे गरजेचे आहे़ अनेक प्रश्नांसोबतच आरक्षणाची गंभीर समस्या उभी असल्याची प्रतिक्रिया मराठा युवकांनी व्यक्त केल्या आहे़राष्ट्रगीतात मराठा पण सवलतीपासून वंचित मराठा समाजातील बांधव मूळात लढवय्या व काटक आहे़े़ देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो़ भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालीयन आहे़ मराठा मेला तर राष्ट्रही मेले, मराठा वीना राष्ट्र गाडा न चाले असे म्हटले जाते़ महाराष्ट्रात राहणारा व मराठी बोलणारा तो मराठा हे स्पष्ट आहे़ शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते़ १८८१ च्या जनगणनेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहेत. बॉम्बे गॅझेटीयर प्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही़ गॅझेटीयर आॅफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही़ शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी हे सर्वदूर परिचित आहे़ १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या ८३ व्या दुरूस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावामराठा समाजाच्या सर्वाधिक शेतकरी आत्महत्यामराठा समाजाची आर्थिक स्थिती वाईट असल्याने या समाजातील ८० टक्के तरूण दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजिविका चालवित आहे़ नापिकीमुळे मराठा-कुणबी समाजातील तीन हजारांहून अधीक समाजबांधवांनी हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे आत्महत्या केल्या आहेत़ त्यामुळे आरक्षणाचा लाभ घेण्यास हा समाज पात्र आहे़ समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही मोठ्या प्रमाणात आहेत. सहकार चळवळीत मराठा समाजाचे मोठे योगदान असले तरी सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस येत आहे़