शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

स्वच्छतेची कोट्यवधींची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 22:55 IST

स्वच्छता कामगारांना किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार वेतन दिल्यास दैनंदिन स्वच्छतेचा वार्षिक खर्च सुमारे ३८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. स्थायीच्या प्रस्तावानुसार , प्रभागनिहाय २२ कंत्राटदार नेमल्यास १४ व्या वित्त आयोगातील संपूर्ण निधी केवळ स्वच्छतेवर खर्च करायचा का? असा यक्षप्रश्न प्रशासनाला पडला आहे. तुर्तास दैनंदिन स्वच्छतेवर होणारा हा खर्च १७ ते १८ कोटींच्या घरात आहे.

ठळक मुद्देपाच वर्षांचे कंत्राट : प्रशासनाचे सॅन्डविच, झोननिहायसाठी ‘कन्सल्टंट’

प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छता कामगारांना किमान वेतन कायद्यातील तरतुदीनुसार वेतन दिल्यास दैनंदिन स्वच्छतेचा वार्षिक खर्च सुमारे ३८ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. स्थायीच्या प्रस्तावानुसार , प्रभागनिहाय २२ कंत्राटदार नेमल्यास १४ व्या वित्त आयोगातील संपूर्ण निधी केवळ स्वच्छतेवर खर्च करायचा का? असा यक्षप्रश्न प्रशासनाला पडला आहे. तुर्तास दैनंदिन स्वच्छतेवर होणारा हा खर्च १७ ते १८ कोटींच्या घरात आहे. त्याअनुषंगाने स्वच्छतेवर ३८ ते ४० कोटी खर्च करण्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती आहे का? यावर १९ जुलैच्या आमसभेत घमासान अपेक्षित आहे.प्रशासनाने प्रभागनिहायऐवजी झोननिहाय कंत्राटाचा प्रस्ताव वजा मत दिले आहे. मात्र, खर्चाच्या संभाव्य आराखड्यावर प्रशासनस्तरावर सामसूम आहे. आमसभेने झोननिहाय पाच कंत्राटदार नेमण्यास मान्यता दिल्यास स्वच्छतेच्या सूक्ष्म अभ्यासासाठी कन्सल्टंट नेमण्याचा प्रशासनाचा मानस आहे. प्रशासनाने संभाव्य खर्चाची चाचपणी केली नाही. दुसरीकडे स्थायीने प्रभागनिहाय प्रस्ताव पारित केल्याने त्यासाठी सुमारे ३८ कोटी रुपये वार्षिक खर्चाचा प्राथमिक आराखडा बनविला आहे. निविदा प्रकियेसाठी आवश्यक अटीशर्र्तींचा मसुदा तयार केला आहे. झोननिहाय आराखडा कन्सल्टंटकडून बनविला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने सत्ताधिशांसह विरोधीपक्षही प्रशासनाला झोननिहाय खर्चावर कोंडीत पकडण्याच्या बेतात आहेत.शहराची स्वच्छता झोननिहाय करणे व्यवहार्य ठरेल, असे प्रशासनाचे मत असेल, तर त्यासाठी येणाऱ्या संभाव्य खर्चाचा आराखडा बनविला काय? अशी विचारणा सदस्य करणार आहेत. त्यामुळे प्रभागनिहायसाठी ज्याप्रमाणे ३८ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचा आराखडा प्रशासनाने बनविला. त्याचप्रमाणे झोननिहाय खर्चाचा अंदाज प्रशासनाला बांधावा लागणार आहे. सव्वा वर्षापासून रखडलेल्या दैनंदिन स्वच्छतेच्या कंत्राटाबाबत आतापर्यत तीनदा निर्णय बदलविण्यात आल्याने काँग्रेस, बसपसह सर्वच विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत.अर्धवेळ अर्धवेतन गुंडाळलामहापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता प्रभागनिहाय स्वच्छतेचा कंत्राट अर्धवेळ अर्धवेतन करायचा, असा एक प्रस्ताव काही नगसेवकांनी दिला होता. त्यावर प्रशासनाने गोळाबेरीज करीत त्यासाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. अर्धवेळ सोबतच प्रशासनाने पुर्णवेळ साठी ३८ कोटी रुपये खर्च येईल, अशी प्राथमिक टिप्पणी तयार केली. त्यानंतर काही नगरसेवकांनी प्रशासनासमक्ष चार व आठ तासांऐवजी सहा तासांचा प्रस्ताव दिला. मात्र, आता प्रशासनाकडून झोननिहायचे मत आल्याने अर्धवेळ वा सहा तासांचा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला आहे.