लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्ता अपघातात जखमी झालेल्या दोन हुमा घुबडांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी वसा संस्थेच्या पक्षिप्रेंमींनी प्रयत्न केले होते.सोनल कॉलनीतील रहिवासी आणि वाइल्ड अॅडव्हेेंंचर संस्थेचे संस्थापक गौरव कडू यांना रस्ता अपघातात जखमी झालेली हुमा घुबड आढळले. त्यांनी वसा संस्थेच्या रेस्क्यू हेल्पलाइनवर माहिती दिली. वसाचे मुकेश वाघ व गौरव कडू यांनी घुबडाला वनविभागाच्या मदतीने पशू चिकित्सालयात नेऊन उपचार मिळून दिले. घुबडाच्या पंखांचे हाड तुटले असल्याने डॉ. हटकर आणि डॉ. कुलकर्णी यांनी शस्त्रक्रिया केली. पुढील काळजीसाठी पक्ष्यांना नेत असतानाच पक्ष्यांची प्राण ज्योत मालवली. अन्य घटनेत मानद वन्यजीव संरक्षक डॉ. जयंत वडतकर यांना चांदूर बाजार ते अमरावती रस्त्यावर एक जखमी हुमा घुबड आढळले. त्यांनी वसाचे गणेश अकर्ते यांच्याशी संपर्क साधून वनविभागाच्या मदतीने घुबडाला उपचार मिळवून दिला. वसाचे अॅनिमल्स केअर टेकर रोहित रेवाळकर, गणेश अकर्ते आणि पशू शल्यचिकित्सक डॉ. हटकर यांनी या घुबडावर उपचार करून जखमेतून १४० च्या वर किडे बाहेर काढले. सायंकाळी घुबडावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, येथेही उपचाराला प्रतिसाद दिला नाही. डॉक्टर आणि वसाच्या सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतरही यश मिळाले नाही. दोन्ही मृत घुबड वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयात वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आणि वनाधिकारी घागरे यांच्या स्वाधीन करण्यात आले.हुमा घुबडाला ‘शृंगी घुबड’ या नावानेही ओळखले जाते. इंग्रजीमध्ये इंडियन ईगल आऊल म्हटल्ल२ जाते. हे घुबड इतर घुबड प्रजातीपेक्षा आकाराने मोठे असते. २ ते ३.५ फूट पंख पसरवते. शेतातील किडे, उंदीर, पाली, सरडे, घोरपड, साप, खारूताई, मुंगूस ते रानबोक्यापर्यंत सर्व प्रकारचे सस्तन प्राणी आणि पक्षी यांची शिकार हा पक्षी करतो.
रस्ता अपघातात जखमी हुमा घुबडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:03 IST
रस्ता अपघातात जखमी झालेल्या दोन हुमा घुबडांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी वसा संस्थेच्या पक्षिप्रेंमींनी प्रयत्न केले होते.
रस्ता अपघातात जखमी हुमा घुबडांचा मृत्यू
ठळक मुद्देमोठ्या पक्ष्यांना फटका : जीव वाचविण्यासाठी पक्षिप्रेंमींकडून प्रयत्न