शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

पोपटखेडच्या जंगलात आढळली मानवी हाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 23:40 IST

माहुली (धांडे) येथील मामी-भाच्याच्या प्रेमप्रकरणात मामा शेख शारीफ लतीफ शेख याची हत्या करून पाच महिने झाल्यानंतर व आरोपींच्या कबुलीजबाबानंतर नऊ दिवसांनी एका मृतदेहाचा सांगाडा दर्यापूर पोलिसांना पोपटखेडच्या जंगलात आढळून आला.

ठळक मुद्देअवशेष कुणाचे? : डीएनए चाचणीनंतर पुष्टी, दर्यापूर पोलिसांना नऊ दिवसानंतर यश

आॅनलाईन लोकमतअमरावती : माहुली (धांडे) येथील मामी-भाच्याच्या प्रेमप्रकरणात मामा शेख शारीफ लतीफ शेख याची हत्या करून पाच महिने झाल्यानंतर व आरोपींच्या कबुलीजबाबानंतर नऊ दिवसांनी एका मृतदेहाचा सांगाडा दर्यापूर पोलिसांना पोपटखेडच्या जंगलात आढळून आला. यामुळे पोलिसांनी तूर्तास सुटकेचा श्वास टाकला आहे.मृतक शारीफची पत्नी फरजाना परवीन व भाचा अल्ताफ शाह साबीर शाह यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाºया शारीफचा जावेद शाह, मोसीन शाह, हुसेन शाह यांच्या मदतीने दुचाकी खरेदी करण्याच्या बहाण्याने दर्यापूर येथून अकोट-पोपटखेड रोडवर नेऊन गळा आवळून खून करण्यात आला. दुसºया दिवशी दर्यापूर पोलीस स्टेशनला शारीफ हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पण, साळा फिरोज शाह (रा. मोर्शी) याने अल्ताफकडून खुनाची कबुली घेऊन दर्यापूर पोलिसांना आरोपींना अटक करण्यास भाग पाडले. १२ जानेवारीला आरोपींनी खुनाची कबुली दिली. पण, मृतदेह आढळला नव्हता.२० जानेवारीला आरसीपीचे २१ जणांचे पथक व दर्यापूर पोलीस ठाण्याचे आठ अधिकारी-कर्मचारी पोपटखेड जंगलात शोध घेत असताना सायंकाळच्या सुमारास मानवी कवटी, दात, पायाचे व हाताचे हाड सापडले व इतर अवयव सापडले. जंगली जनावरांनी शरीराचे लचके तोडल्याचे दिसून येत होते. सापडलेले अवयव मृत शारीफचे असल्याचे पोलीस दावा करीत आहेत. माहुली (धांडे) येथील शारीफ हत्याकांड उघडकीस आणण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे व दर्यापूरचे ठाणेदार मुकुंद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. डीएनए चाचणीनंतर मृतदेहाबाबत पुष्टी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.यांनी लावला खुनाचा छडामृतक शारीफचा मृतदेह मिळून येण्याकरिता मागील नऊ दिवसापासून रात्रंदिवस एक करूण शोध घेणारे रितेश राऊत तपास अधिकारी, मंगेश मोहोड पीएसआय, पोलीस कर्मचारी प्रशांत ढोके, सिद्धांत आठवले, विनोद पवार, सौरभ धरमठोक, सागर नाटे, रूपेश गावंडे व पोलीस मित्र शाकीर हुसेन या तपास पथकाने शारीफ हत्याकांडाचा छडा लावला.