शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उद्घाटनालाच हुक्का पार्लरचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 22:35 IST

उदघाटनाच्या दिवशीच जयस्तंभ चौकातील प्रिया थिएटरच्या बाजूला असलेल्या हॉटेल रजवाडातील हुक्का पार्लरचा पदार्फाश झाला.

ठळक मुद्देहॉटेल रजवाडा येथील प्रकार : मालकासह सहा जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उदघाटनाच्या दिवशीच जयस्तंभ चौकातील प्रिया थिएटरच्या बाजूला असलेल्या हॉटेल रजवाडातील हुक्का पार्लरचा पदार्फाश झाला. कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री या हुक्का पार्लरवर धाड टाकून मालकासह सहा जणांना अटक केली. घटनास्थळावरून हुक्क्याचे साहित्य व विविध फ्लेवर असा एकूण ६४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.पोलीस सूत्रांनुसार हॉटेल रजवाडा हे निकेश हरीशकुमार प्रधान (रा.नवी वस्ती, बडनेरा) यांनी नुकतेच चालविण्यासाठी घेतले होते. सकाळी हुक्का पार्लरचे थाटात उद्घाटन झाले. येथे ग्राहकांची वर्दळ सुरु झाली होती. मात्र, शहरातील हुक्का पार्लर संस्कृतीवर पोलिसांनी फास आवळला आहे. असे असूनही नव्याने हुक्का पार्लर सुरु करण्याचे धाडस संचालकाने दाखविले. याबाबत गुप्त माहिती मिळताच कोतवालीचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय कदम, पीएसआय राजमल, अब्दुल कलाम, गजानन ढेवले, प्रफुल्ल खोब्रागडे, विनोद भगत, सागर ठाकरे, सचि शेळके व गांवडे यांनी हॉटेल रजवाडावर धाड टाकली. त्याठिकाणी पाच युवक हुक्का पिताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेल मालक निकेश हरिशकुमार प्रधान व योगेश सुरेश चुलपार (रा.खापर्डे बगिचा) व मंथन विशाल निंबोरकर (रा.पारीजात कॉलनी), अंकुश महादेव घामाडे (रा.डाबकी रोड, अकोला), रामेश्वर विश्वनाथ तारापुर, सौरभ देवराव वानखडे (रा.वैभव कॉलनी) अशा सहा जणांना अटक केली. पोलिसांनी रजवाडा हॉटेलमधून हुक्का पार्लरचे साहित्य, विविध प्रकारचे तंबाखू फ्लेवर असा एकूण ६४ हजारांचा ऐवज जप्त केला.