शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

हावडा-मुंबई मेलच्या इंजीनला आग, चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 20:39 IST

मुंबई हावडा छत्रपती टर्मिनस एक्सप्रेसच्या इंजीनला अचानकपणे आग लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत एअरब्रेक मारून उडी घेतली.

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे : मुंबई हावडा छत्रपती टर्मिनस एक्सप्रेसच्या इंजीनला अचानकपणे आग लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत एअरब्रेक मारून उडी घेतली. यात एक चालक गंभीर जखमी झाला, तर दुस-या सहायक चालकाचे डोक भाजले. या घटनेमुळे प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना धामणगावजवळील हिंगणगाव कासारखेड हद्दीत ४ वाजून १० मिनिटांनी घडली.  पुलगाव दरम्यान चालक एस. क़े.विश्वकर्मा (३५) यांचा मृत्यू आहे़

धामणगाव रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक १२८१० हावडा मुंबईची येण्याची वेळ ४ वाजून १२ मिनीट असताना पोल क्रमांक ७१५ जवळ या गाडीच्या इंजीनला तांत्रिक कारणामुळे आग लागली. इंजिनमधून धूर निघत असल्याचे पाहून चालक ब्रम्हे यांनी प्रसंगावधान राखत एअरब्रेक मारून बाहेर उडी घेतली. याच दरम्यान सहायक चालकाने एअर कॉप्रेसरने आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल दहा मिनीट हे इंजिन जळत राहिले. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी गाडीतून उडी घेतली़ मात्र, सुदैवाने गाडीचा वेग कमी झाल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही़

मालगाडीच्या चालकाची तत्परता धामणगाव रेल्वे स्थानकाकडून पुलगावकडे जाणाºया मालगाडीला मेल एक्सप्रेसच्या इंजिनमधून धूर निघत असताना दिसले. धामणगाव रेल्वे स्थानकाचे अधीक्षक जे़डीक़ुलकर्णी यांच्याकडून तत्क्षण संदेश येताच ही मालगाडी थांबवून गंभीर चालकाला पुलगाव येथे रूग्णालयात दाखल केले़

ग्रामस्थांचीही मदत़याच ठिकाणी ३० वर्षांपूर्वी हावडा अहमदाबाद या गाडीला अपघात झाला. त्यावेळेची घटनेची बाब अनेक ग्रामस्थांच्या लक्षात आली. नजीकच्या हिंगणगाव कासारखेड येथील ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी पोहचून प्रवाशांना मदत केली़ मेल एक्सप्रेसचे सहायक चालकाचे डोके भाजल्याने बाजार समितीचे उपसभापती दुर्गाबक्षसिंह ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला उपचारासाठी बर्फ दिलेत़

प्रवासी गाड्या दोन तास उशिराहावडा-मुंबई या गाडीच्या इंजीनला आग लागल्याने ही गाडी धामणगाव रेल्वे स्थानकावर दोन तास उभी होती़ पूर्वीच दोन तास उशिरा धावणारी हावडा कुर्ला, वर्धा तर नियमित चालणारी विदर्भ एक्सप्रेस पुलगाव रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आली़