शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

-तर अमरावती शहराचा मोठा परिसर झाला असता बेचिराख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:20 IST

नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ने भरलेला टँकर शनिवारी पहाटे उलटला. प्रशासनाने संपूर्ण सावधगिरी बाळगून टँकरला चाकांवर ठेवले. यावेळी काहीही चूक झाली असती तरी उन्हाच्या पाऱ्याने गॅसचा भडका उडाला असता आणि चार ते पाच किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला असता. यामुळे परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती.

ठळक मुद्देप्रशासनाची तत्परता : नांदगाव पेठ टोलनाक्याजवळ एलपीजी टँकर उलटला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ने भरलेला टँकर शनिवारी पहाटे उलटला. प्रशासनाने संपूर्ण सावधगिरी बाळगून टँकरला चाकांवर ठेवले. यावेळी काहीही चूक झाली असती तरी उन्हाच्या पाऱ्याने गॅसचा भडका उडाला असता आणि चार ते पाच किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला असता. यामुळे परिसरातील नागरिकांची भीतीने गाळण उडाली होती.एलपीजीने भरलेला यूपी १७ एटी ४६९५ क्रमांकाचा महाकाय टँकर सुरतवरून वाडी (नागपूर) येथे नेण्यात येत होता. नांदगावपेठ टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने टँकर वळत असताना अचानक रस्तालगतचे कठडे तोडून उलटला. १७ ते १८ टन गॅस असलेल्या कंटेनरचे वजन ३५ टनाच्या आसपास होते. गॅस लिकेज झाला असता, तर चार ते पाच किलोमीटर परीसर बेचिराख झाला असता. मात्र, प्रशासनाने जलद पावले उचलून हा धोका टाळला. अग्निशमन दलासह गाडगेनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. अधिकाºयांनी क्रेन बोलावून टँकर चाकांवर ठेवण्यासाठी तीन क्रेन बोलावल्या. दुसरीकडे अग्निशमन चमू हातात फोम टेंडर घेऊन संभाव्य आग टाळण्यासाठी सज्ज होते.चालक आझाद अली जखमीएलपीजीने भरलेला टँकर चालक आझाद अली (२६, रा. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) नागपूरला घेऊन निघाला होता. अकोला मार्गावरून वळत असताना अचानक टँकर सुरक्षा कठडे तोडून रस्त्यालगतच्या जागेवर जाऊन उलटला. या अपघातात जखमी आझाद अलीला उपचारासाठी इर्विनमध्ये दाखल करण्यात आले आहे.अग्निशमन दल फोम टेंडर घेऊन सज्जटँकर उलटल्याची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रान्सपोर्ट उपकेंद्रप्रमुख सैयद अन्वर व मुख्य अग्निशमनचे चालक नसीबखां पठाण, राऊत, फायरमन दहातोंडे, सतीश घाटे, निखिल बाटे, शिवा आडे आग विझविण्यासाठी सज्ज झाले. टँकर क्रेनने पूर्वस्थितीला येताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.