शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका अधिकाऱ्यांचे मनोबल वाढणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:07 IST

जिल्हा सत्र न्यायालयासमोरील अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकाने तक्रार दिल्याने महापालिकेचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढणार कसे, निर्भिडपणे कारवाई कशी करणार, असा कर्मचाºयांचा सवाल आहे. त्याचा थेट परिणाम महापलिकेच्या कामकाजावर होणार आहे. जे अतिक्रमण काढताना कुत्तरमारेंवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. ते अतिक्रमण मात्र आजही जैसे थेच आहे.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचे मौन : अतिक्रमण जैसे थै, कुत्तरमारेंवर अ‍ॅट्रॉसिटी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सत्र न्यायालयासमोरील अतिक्रमण काढताना अतिक्रमणधारकाने तक्रार दिल्याने महापालिकेचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकारामुळे प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोबल वाढणार कसे, निर्भिडपणे कारवाई कशी करणार, असा कर्मचाºयांचा सवाल आहे. त्याचा थेट परिणाम महापलिकेच्या कामकाजावर होणार आहे. जे अतिक्रमण काढताना कुत्तरमारेंवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. ते अतिक्रमण मात्र आजही जैसे थेच आहे.जिल्हा सत्र न्यायालय व जिल्हा परिषदेला लागून अनेक वर्षांपासून अतिक्रमण आहे. या अतिक्रमणावर अनेकदा कारवाई करण्यात आली. यावेळी २५ जानेवारीला अतिक्रमण विभागाने कारवार्ई केली. ज्यावेळी कारवार्ई सुरू होती, त्यावेळी कुत्तरमारे हे विभागीय आयुक्त कार्यालयात एका बैठकीला उपस्थित होते. नंतर ते घटनास्थळी आलेत. या अतिक्रमणावर कारवाई दरम्यानची क्लिप व्हायरल झालेली आहे. त्यामध्ये अनेक बाबी उघड झाल्यात. त्यानंतर तक्रारकर्त्यांने कुत्तरमारे यांच्यावर जातीवाचक शिविगाळ केल्याने त्यांच्या अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली व आंदोलनही केले. यासर्व प्रकारात पोलिसांनी दबावात येऊन कुत्तरमारे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आता होत आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत.अतिक्रमण काढण्याची कारवाई करतेवेळी हे अतिक्रमण कोणाचे, जात-पात, धर्म कोणता याची कुठलीही माहिती अधिकाºयांना नसते. या कारवाई दरम्यानची वस्तुस्थिती त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या एका पत्रकाराने आदिवासी, पारधी विकास परिषदेचे अध्यक्षांच्या पत्रपरिषदेत विशद केली असता, यावर खुद्द आयोजकांनी यावर सारवासारव केली. त्यामुळे कुत्तरमारे यांच्यावर दाखल गुन्हा ही फिल्डवर कामे करणाºया अधिकाºयांचे मनोधैर्य खच्ची करणारी बाब ठरली आहे. महापालिकेच्या सर्व कर्मचाºयांनी याबाबत रोष व्यक्त करीत महापालिकेचे कामकाज बंद पाडले. महापौरांसह आयुक्तांनी याबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. कुत्तरमारे आता रजेवर गेले. आता पुरता अतिक्रमण विभागच कोमात गेला आहे. अशातच न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला आहे. याचा महापालिकेच्या दैंनदिन कामकाजावर मोठा परिणाम होईल, हे वास्तव आहे.कामकाजावरच अनिष्ट परिणामकुत्तरमारे यांच्यावर दाखल गुन्ह्यानंतर कोणताही अधिकारी प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करण्यास धजावणार नाही किंवा निर्भिडपणे काम करणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर याचा परिणाम होणार आहे. कुत्तरमारे यांच्या पाठीशी कर्मचारी भक्कमपणे उभे राहिले. अधिकारी, कर्मचाºयांचे मनोबल खच्ची करणाºया या प्रकारानंतर महापालिकेचे पदाधिकारीदेखील चुप्पी साधून आहेत. अधिकाºयांवर दडपण आणून काम करून घेणाºया पदाधिकाºयांनी या प्रकरणामध्ये कोणाशी संवाद साधला, काय सहकार्य केले. याबाबत नकारघंटाच आहे. या सर्व प्रकारामुळे प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम करणाºया अधिकाºयांच्या पाठीशी कोण, हा प्रश्नदेखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.