शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या पुनर्मूल्यांकनात गुणवाढ कशी?, विद्यापीठात डाटा एन्ट्रीचा घोळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:56 IST

विद्यापीठात डाटा एन्ट्री खासगी व्यक्तीकडून करण्यात येते.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत अगोदर अनुत्तीर्ण मात्र, पुनर्मूल्यांकनात उत्तीर्ण हा घोळ कायम आहे. अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याला ७ गुणांचे पुनर्मूल्यांकनानंतर ५२ गुण दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठात ऑनलाइन कारभार रामभरोसे तर सुरू नाही ना, असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

विद्यापीठात डाटा एन्ट्री खासगी व्यक्तीकडून करण्यात येते. त्यानुसार अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची डाटा एन्ट्री करण्यात आली आहे. मात्र, ते करताना आॅपरेटरकडून प्रचंड त्रुटी असल्याची बाब निदर्शनास आली आहे. उन्हाळी २०१९ अभियांत्रिकी परीक्षेत बहुतांश विद्यार्थ्यांना काही विषयात अनुत्तीर्ण गुणपत्रिका मिळाली. मात्र, तो विषय चांगला सोडविला असताना नापास कसे, या प्रश्नाने विद्यार्थी गोंधळात पडले.

परिणामी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी त्या विषयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला असता, तो गोपनीय विभागाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार गोपनीय विभाग पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जाची चाचपणी करून त्या विषयाची उत्तरपत्रिका पाहते. खरेच त्या विद्यार्थ्याला कमी गुण असल्यास त्याचे पुनर्मूल्यांकन केले जाते, अन्यथा उत्तरपत्रिकेवर गुण जास्त असल्यास त्या विद्यार्थ्याशी संपर्क साधून उत्तरपत्रिकेवर असलेले गुण अंकित करून मूळ गुणपत्रिका देण्याची विद्यापीठाची नियमावली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना होणारा त्रास, मनस्ताप, कुटुंबीयांची नाराजी, आर्थिक नुकसान आदी बाबीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमरावती विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकीचे २३ महाविद्यालये असून, जवळपास बहुतांश महाविद्यालयांत पुनर्मूल्यांकनानंतर गुणवाढ झाल्याचे वास्तव आहे. डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या चुकीमुळे उत्तरपत्रिकेवरील गुण कमी टाकण्यात येत असल्याने आॅनलाईन गुणपत्रिका पाठविली जाते, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.पुनर्मूल्यांकनाच्या शुल्काचे काय?विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज सादर करतात. त्याकरिता विद्यार्थ्यांना शुल्क मोजावे लागतात. त्यानंतरच पुनर्मूल्यांकन होते. मात्र, उत्तरपत्रिकेवर गुण अधिक असल्याचे निदर्शनास आल्यास पुनर्मूल्यांकन केले जात नाही. परंतु, विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी दिलेले शुल्क विद्यापीठ परत करते अथवा नाही, हा गंभीर विषय असल्याचे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना त्याला पुनर्मूल्यांकनाला सामोरे जावे लागत आहे, हे विशेष.विद्यापीठ कायद्यानुसार १९/२००१ च्या सुधारणेअंती पुनर्मूल्यांकनाच्या चाचपणीनंतर उत्तरपत्रिकेवर गुण वाढीव असल्यास नव्याने गुणपत्रिक  संचालकांना देता येते. आतापर्यंत अभियांत्रिकीच्या १५ विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका देण्यात आल्या आहेत.   - हेमंत देशमुख,   संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावती