शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर भावेश आवारात पडला कसा?

By admin | Updated: August 31, 2016 00:08 IST

शहरापासून शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील गोविंद गुरुकुल आश्रमशाळेत भावेश माकोडे हा इयत्ता तिसरीत शिकतो.

गोविंद गुरुकुल आश्रम शाळाप्रकरण : समाजकल्याण अधिकारी झोपेतसुमित हरकुट चांदूरबाजारशहरापासून शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या रिद्धपूर येथील गोविंद गुरुकुल आश्रमशाळेत भावेश माकोडे हा इयत्ता तिसरीत शिकतो. २४ आॅगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजतादरम्यान तो वसतिगृहात वरच्या मजल्यावरून खाली कोसळला. मात्र ही दुर्घटना घडली त्याच दिवशी वसतिगृहाच्या हजेरी पुस्तिकेत भावेश गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. तो गैरहजर असताना वसतिगृहाच्या आवारात ही दुर्घटना घडली कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. भावेश हा विद्यार्थी खाटीक समाजाचा रिद्धपूर याच गावातील रहिवासी असून त्याला वसतिगृहातील निवासी विद्यार्थी दाखविण्यात आले आहे. वसतिगृहाच्या हजेरी पुस्तकानुसार त्याचा अनुक्रमांक वर्ग तिसरीमधील ५० वर त्याच्या नावाची नोंदही आहे. नियमानुसार स्थानिक विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देता येत नाही. विशेष बाब अशी की, वसतिगृहाच्या हजेरी पटावर मागील संपूर्ण दिवस वसतिगृहात उपस्थित असणाऱ्या भावेशला घटनेच्या दिवशी शाळेत हजर असतानाही वसतिगृहामध्ये गैरहजर असल्याचे दाखविण्यात आले आहे. २४ आॅगस्टला उपस्थितीच्या रकाण्यात त्याच्या नावापुढे कोणतीच नोंद घेण्यात आली नाही. असे का करण्यात आले, याचे उत्तर शाळा प्रशासन देऊ शकले नाही. या घटनेनंतर संबंधित वसतिगृहाचा हजेरी पटाचे २६ आॅगस्टच्या सायंकाळी अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, २५ व २६ आॅगस्ट या दोन दिवसांच्या वसतिगृहातील उपस्थित विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या नव्हत्या. या नोंदी का घेण्यात आल्या नाहीत हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. या वसतिगृहात एकूण १२० विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या असल्याचे दर्शविण्यात आले आहे. त्यानुसार संपूर्ण महिनाभर १२० विद्यार्थी उपस्थित असल्याचे दाखविण्यात आले आहे. घटनेच्या दिवशी ३० विद्यार्थी अनुपस्थित दाखविण्यात आले. परंतु सलग तीनदिवस वसतिगृहाची पाहणी केली असता प्रत्यक्ष ५० ते ५५ विद्यार्थी वसतिगृहात उपस्थित असल्याचे आढळून आले आहेत.याविषयी संबंधितांकडून माहिती घेतली असता विद्यार्थी राखी पौर्णिमेनिमित्त गावाला गेली असल्याचे सांगण्यात आले. सलग आठ दिवस विद्यार्थी गैरहजर असतानासुद्धा हजेरीपटावर १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखविण्यात आली आहे. मग घटनेच्या दिवशी एवढ्या मोठ्या संख्येत विद्यार्थी गैरहजर कसे? ही किमया शाळेच्या कर्तबगार मुख्याध्यापकांनी केली असावी, असा अंदाज नागरिकांकडून वर्तविली जात आहे.समाजकल्याण अधिकारी केव्हा देणार भेट ?या आश्रमशाळेत इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही समाजकल्याण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची घटना माहिती असूनही वसतिगृहाला साधी भेटही दिली नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर २६ आॅगस्ट रोजी येणारे समाजकल्याण अधिकारी आजवर वसतिगृहापर्यंत पोहोचू शकले नाहीत, यामागील खरे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांची पडताळणी आवश्यकगोविंद गुरुकुल आश्रमशाळेतील १२० निवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जातीनिहाय प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावरून चौकशी होणे गरजेचे आहे. या वसतिगृहाला व्हीजेएनटीची मान्यता प्राप्त असताना या विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्यात आला आहे काय, याची प्रामाणिक चौकशी झाल्यास या आश्रमशाळेतील प्रवेश व देण्यात येणाऱ्या सुविधा उघडकीस येईल, हे मात्र निश्चित.