शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कामात दिरंगाई तर बिले कशी काढली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : अमृत पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण कामे २०१८ पर्यंतच पूर्ण व्हायला हवी होती, परंतु ती झाली ...

ठळक मुद्देआढावा बैठक : सुलभा खोडके यांचा अधिकाऱ्यांना सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमृत पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण कामे २०१८ पर्यंतच पूर्ण व्हायला हवी होती, परंतु ती झाली नाहीत. कंत्राटदाराला मुदतवाढ दिल्यानंतरही कामे प्रलंबित आहेत. कंत्राटदार अधिकाऱ्यांचे ऐकत नाही अशा तक्रारी आहेत. नाशिकच्या मुख्य कंत्राटदाराने सबएजन्सी नेमली. मात्र तरीही कामे अपूर्ण आहेत. जर कामात ऐवढी दिरंगाई होत असेल तर कंत्राटदारांचे अधिकाऱ्यांनी बिले कशी काढली, असा सवाल आमदार सुलभा खोडके यांनी केला. अभियंत्यांना या दिरंगाईचा जाब विचारला. कामे होत नसतील तर कंत्राटदारांची बिले रोखा, अशा सूचनाही यावेळी आमदारांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या. शुक्रवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता कार्यालयाच्या मिटींग हॉलमध्ये आमदार सुलभा खोडके यांनी पाणीपुरवठा योजना व शहरातील रखडलेल्या कामांचा आढावा घेतला.‘अमृत पाणीपुरवठा योजना’ आतापर्यंत का पूर्ण झाली नाही, असा सवाल आमदार खोडके यांनी अधिकाºयांना केला. तेव्हा कामे सुरू आहेत. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे अभियंत्यांनी आमदारांना सांगितले. मात्र, अधिकाºयांनी दिलेल्या माहितीवरून आमदारांचे समाधान झाले नाही. ही पहिली आढावा बैठक आहे. त्यामुळे आता समस्या ऐकून घेत आहे. दुसऱ्या आढावा बैठकीपर्यंत शहरातील सुरू असलेली विकासकामे मार्गी लागली नाहीत तर आम्हाला जे करायचे ते करू असा दम आमदार खोडके यांनी यावेळी अधिकाऱ्यांना भरला. यावेळी योजनेची प्रलंबीत कामे, भुयारी गटार योजना, पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणी असतानाही आठ-आठ दिवस पाणीपुरवठा का बंद असतो. असा सवाल आमदारांनी केला? त्यावर धरण ते अमरावती शहरापर्यंत नवीन पाईपलाईन बदलविण्याचा २१७ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. भविष्यातील पाणीपुरवठा योजनेची समस्या सोडविणे गरजेचे असून आपण त्यासाठी पाठपुरवठा करू असेही खोडके यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी मनोज केवले यांनी सुद्धा शहरात जीवनप्राधीकरणाचा कारभार सुरु आहे. त्यामुळे लोकांना कसा त्रास सहन करावा लागत असल्याचे गºहाणेमांडले. यावेळी मुख्य अभियंता विजय जगतारे, अधीक्षक अभियंता सुरेश चारथड, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, अभियंता किशोर रघुवंशी, आर. एस. डकरे, यांच्यासह जीवनप्राधीकरणाचे इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच माजी महापौर किशोर शेळके, माजी स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, प्रशांत डवरे, गजानन राजगुरे, अफसर बेग, मिनल सवई, मनोज भेले यांच्यासह इतर पदाधिकाºयांची उपस्थिती होती.दोन नवीन टाक्यांची कामे अंतिम टप्प्यातपार्वती नगर व बेनोडा येथील अमृत योजनेतील दोन नवीन पाण्याच्या टाक्यांची कामे पुर्ण झाली असून फक्त अऊटलेटचे कनेक्शन जोडणे बाकी आहे. तसेच नवीन जलशुध्दीकरण केंद्राचे सुद्धा लवकरच काम पुर्ण होणार असल्याची माहिती यावेळी सुरेंद्र कोपूलवार यांनी आमदारांना दिली.