शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

किती हा बेडरपणा! पतीसोबत जाणाऱ्या महिलेच्या पाठीवरून फिरविला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:28 IST

पतीसोबत दुचाकीहून जाणाऱ्या एका महिलेच्या पाठीवर काळीपिवळीतून जाणाऱ्या टोळक्यापैकी काहींनी चक्क हात फिरविला.

ठळक मुद्देहटकणाऱ्या पतीला मारहाण: लागोपाठ तीन घटना, रोडरोमिओंमुळे सामान्यजन दहशतीत, अंबानगरी असुरक्षित, पालकमंत्री सुस्त

अमरावती : पतीसोबत दुचाकीहून जाणाऱ्या एका महिलेच्या पाठीवर काळीपिवळीतून जाणाऱ्या टोळक्यापैकी काहींनी चक्क हात फिरविला. या कृत्याचा जाब विचारणाऱ्या तिच्या पतीला पुढच्या चौकात काळीपिवळीतील चौघांनी मारहाण केली. होय, चित्रपटात शोभावी अशी ही घटना आपल्या सुसंस्कृत अमरावतीत घडली. ही एकच नव्हे अशा स्वरुपाच्या लागोपाठ तीन घटना घडल्या. सततच्या या त्रासाने शहरातील आया-बहिणी जेरीस आल्या आहेत. ताफ्यात फिरणारे आपले पालकमंत्री मात्र त्यांच्या आगामी निवडणुकीच्या गणितांत व्यस्त आहेत.चांदणी चौकातील एक २३ वर्षीय महिला तिच्या पतीसोबत दुचाकीने जात होती. ते दाम्पत्य पंचवटीकडून इर्विन चौकाकडे येत असताना एमएच २७ बीक्यू-००४० क्रमांकाची स्कूल व्हॅन त्यांच्या दुचाकीजवळ आली. चालकाशेजारी बसलेल्या इसमाने दुचाकीवर बसलेल्या त्या महिलेच्या पाठीवरून हात फिरविला. पतीने त्या टारगटांना हटकले. पुढे इर्विन चौकात सिग्नलवर दुचाकी थांबविली. त्यावेळी चारचाकीतील अज्ञातांनी ‘तुला काय करायचे, ते करून घे’ अशी धमकी दिली आणि खाली उतरून तीन ते चार अनोळखी इसमांनी महिलेसमोर पतीला मारहाण केली. हा प्रकार इर्विन चौकातील वाहतूक शाखेनजीक घडला. हादरलेल्या दाम्पत्याने गाडगेनगर पोलिसठाणे गाठले. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.बडनेरा हद्दीतील अमरावती ते बडनेरा दरम्यान उड्डानपुलाखाली महिलेचा विनयभंग करण्यात आला. एक महिला तिच्या मैत्रिणीसोबत उड्डाणपुलाखालून कालीमाता नगराकडे पायी जात होती. दरम्यान, दुचाकीवर आलेले आरोपी इमराव बेग (३५, रा. जुनीवस्ती, बडनेरा) व त्याच्या दोन मित्रांनी महिलेला रस्त्यात अडवून विनयभंग केला. या घटनेच्या फिर्यादीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपीला अटक केली.कोतवाली हद्दीतील एका मुलीचा सतत पाठलाग करीत असल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रोहित सतीश रामेकर (१९, रा. जयनगर) याला अटक केली आहे. रोहितने पीडितेच्या फेसबूकवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठविली. तिने ती स्वीकारताच मोबाइल क्रमांक मिळवून संवाद साधला. त्यानंतर तो तिला वारंवार फोन करायचा. पाठलागही करायचा. ही बाब तिने आई व काकांना सांगितल्यावर काही दिवस शांततेत गेलेत. मात्र, रविवारी पुन्हा त्याने पाठलाग केला.