शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या घिरट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:12 IST

मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आतील परिसरात फिरण्यास बंदी असतानाही अनेक उमेदवार मतदान केंद्रांवर घिरट्या घालीत प्रचार करताना आढळून आले.

नियम डावलून १०० मीटरच्या आत प्रचार : पोलीस आयुक्तांकडे तक्रारींचे ‘कॉल’ अमरावती : मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आतील परिसरात फिरण्यास बंदी असतानाही अनेक उमेदवार मतदान केंद्रांवर घिरट्या घालीत प्रचार करताना आढळून आले. याबाबत अन्य उमेदवार व कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार केली. मात्र, हा प्रकार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहून मतदान केंद्रावरून उमेदवारांनी काढता पाय घेतला. मंगळवारी शहरातील बहुंताश मतदान केंद्रांवर हाप्रकार बघायला मिळाला. महापालिका निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेला मंगळवारी सकाळी सुरूवात झाली. सकाळच्यावेळी केंद्रांवर गर्दी कमी असली तरी दुपारी मतदारांचा ओघ वाढला. दरम्यान ्अनेक केंद्रांवर उमेदवारांनी मतदारांना मतदानाबाबत छुपे मार्गदर्शन सुरूच ठेवले होते. हाप्रचार मतदारांच्या घरापासूनच सुरु झाला. काही उमेदवारांनी तर चक्क मतदान केंद्रांवर घिरट्या घालण्यास सुरुवात केली. उमेदवारांना मतदानकेंद्रांवर जाऊन प्रक्रिया सुरळीत सुरु आहे किंवा नाही, याची शहानिशा करण्याचे अधिकार आहेत. मात्र, केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणताही उमेदवार मतदारांना भेटून प्रचार करू शकत नाही. मात्र, मंगळवारी अनेक मतदान केंद्रांवर असे प्रकार घडल्याने अनेक उमेदवार व कार्यकर्त्यांनी थेट पोलीस आयुक्तांच्या मोबाईलवर कॉल करून माहिती दिली आणि परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्यात. प्रशांतनगरातील प्रशांत विद्यालय, विलासनगरातील शाळा क्रमांक १७, मुजफ्फरपुरा, अलीमनगरातील शाळा क्र.७, खोलापूरी गेट परिसरातील मतदान केंद्र, रुरल कॉलेज आदी केंद्रांवर हा प्रकार घडला. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी वायरलेसवरून संबधीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. हाप्रकार थांबविण्यासाठी तत्काळ पोलिसांचा ताफा मतदानकेंद्रांवर पाठवून उमेदवारांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. मात्र, मतदानकेंद्रांवर पोलिसांचा ताफा पोहचण्यापूर्वीच प्रचार करणाऱ्या उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे निदर्शनास आले. पोलीस पोहचताच मतदान प्रक्रिया सुरळीत सुरु असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेतमहापालिका निवडणुकीत किरकोळ अपवाद वगळता मंगळवारी मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, मतदान केंद्र व बाहेरील बंदोबस्तासाठी सज्ज पोलिसांची कायदा व सुव्यवस्था राखताना चांगलीच दमछाक झाली. मतदान केंद्रांवर पोलीस यंत्रणा चौकस नजर ठेऊन होती. मात्र, तरीसुद्धा काही उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदात्यांना प्रलोभन देण्याचे कार्य छुप्या मार्गाने सुरु ठेवले होते. मतदान केंद्रावर काही उमेदवारांचे किरकोळ वाद सुद्धा झाले. रुरल कॉलेज येथील मतदान केंद्रावर भाजपचे काही कार्यकर्ते मतदारांना भेटून प्रचार करीत असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांच्यासमोर असे प्रकार घडत असतानाही पोलीस कारवाई करीत नसल्याचे पाहून काही वेळ गोंधळाची स्थिती उत्पन्न झाली होती. त्यामुळे हाप्रकार थांबविण्यासाठी थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे मौखिक तक्रार करण्यात आली. दरम्यान दोन्ही गटांमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर हा वाद शांत झाला. मात्र, काही वेळ तणावसदृश वातावरण दिसून आले. मतदारांसाठी आॅटोरिक्षाची सुविधामतदारांना घरापासून मतदानकेंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी आॅटोरिक्षाची सेवा नियमबाह्यपद्धतीने पुरविण्यात आली होती. मतदार घराबाहेर पडताच अनेक उमेदवार त्यांना आपल्यालाच मतदान करा, असे आवर्जुन सांगत होते. हा प्रकार सर्रास सुरू होता. ‘व्हिक्टर कॉलिंग’मुळे पोलिसांची दाणादाणमतदानकेंद्र व बाहेरील परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. आपातकालिन स्थितीचा सामना करण्यासाठी सुद्धा स्वतंत्र पोलीस यंत्रणा सज्ज होती. मतदान सुरु झाल्यानंतर पोलीस आयुक्तांचा मोबाईल खणखणू लागला. अनेकांनी मतदान केंद्रावरून थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या. तक्रारी ऐकल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ सूत्रे हलवून पोलीस यंत्रणा मतदान केंद्रांवर पाठविली. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली होती. एका कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे मतदान केंद्रमहापालिका निवडणुकीच्या मतदारयादीत दरवर्षी काही ना काही त्रुटी आढळून येतात. यंदाही काही मतदानकेंद्रावरील यादीत मतदारांची नावे नसल्याचा अनुभव आला. एकाच कुटुंबातील काही सदस्यांची नावे एका मतदान केंद्रावर तर काहींची नावे दुसऱ्याच यादीत असल्याने मतदारांना वेगवेगळ्या केंद्रांवर जाऊन महत्प्रयासाने त्यांची नावे शोधावी लागली. पैसेवाटपाच्या चर्चेला उधाणनिवडणुकीत मतदारांना आकृष्ट करण्याकरिता पैशाचे वाटप होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यंदाही छुप्या मार्गाने मतदारांना छुप्या मार्गाने पैसेवाटप झाल्याच्या चर्चेला शहरात उधाण आले होते. यासंबधाने प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, अद्याप पैसेवाटप केल्याचे स्पष्ट झाले नाही. शंभरावर गुन्हेगार ‘डिटेन’मतदानप्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी शंभरावर गुन्हेगारांना ‘डिटेन’ करून ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यातील काही गुन्हेगार निगराणीत ठेवले होते. त्यामुळे मतदान शांततेने व पारदर्शीपणे पार पडले.