शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार कुटुंबांच्या गृहभेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:38 IST

प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी आणि पारधी आवास योजनेंतर्गत सर्व घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत.

ठळक मुद्देआवास योजना : अधिकारी-पदाधिकारी पोहोचले गावोगावी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी आणि पारधी आवास योजनेंतर्गत सर्व घरकुलांची कामे दिवाळीपूर्वी सुरू करून डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत. त्यानुसार मंगळवार २३ आॅक्टोबर रोजी १४ तालुक्यांत जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी ७ हजार कुटुंबांच्या गृहभेटी घेण्यात आल्या आहेत.पहिला हप्त्याची उचल करूनही घरकुलाचे बांधकाम न करणाऱ्या मागील तीन वर्षांतील ७ हजार ३०० लाभार्थ्यांच्या भेट घेऊन घरकुलांची कामे सुरू केली आहेत. या उपक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, वनिता पाल, सुशीला कुकडे, मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अतिरिक्त मुख्यकार्यपालन अधिकारी विनय ठमके, प्रकल्प संचालक आनंद भंडारी, डेप्युटी सीईओ नारायण सानप, दिलीप मानकर, प्रशांत थोरात, माया वानखडे, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, प्रशांत गावंडे, राजेश सावळकर, कॅफो रवींद्र येवले, जिल्हा पशुसंर्वधन अधिकारी विजय राहाटे, समाज कल्याण अधिकारी चेतन जाधव व बीडीओंनी एकाच दिवशी १२ तालुक्यांत गृहभेटी दिल्या आहेत. अमरावती व भातकुली तालुक्यात बुधवार, २४ आॅक्टोबर रोजी हा उपक्रम राबविला जाणार आहे.जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने ग्रामीण भागात कच्च्या घरात राहणाऱ्या लाभार्थ्यांना पक्की घरे बांधून घेण्याची ही संधी होती. मात्र, यातील सन २०१६-१७ मधील ४७ लाभार्थ्यांनी कामे सुरू केलेली नाहीत. या लाभार्थ्यांना आता या मोहिमेत घरकुल बांधकामासाठी शेवटची संधी दिली जाईल. या गृहभेटी देऊन घरकुलाचे कामे सुरू करण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. ही कामे येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना लाभार्थ्यांना या मोहिमेत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.घरकुल मंजूर झाल्यानंतर जिल्हाभरातील ७ हजारांवर लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याची उचल केली. मात्र बांधकाम सुरू केले नाहीत. अशा सर्व लाभार्थ्यांच्या गृहभेटी पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयातून घेण्यात आल्या आहेत. यात बऱ्याच ठिकाणी कामे सुरू झालेले दिसून आले.- मनीषा खत्री,मुख्यकार्यकारी अधिकारी