शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त एएसआयच्या घरी दहा लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:41 IST

शहरात काही दिवस शांतता राहिल्यानंतर चोरट्यांनी आपले डोके पुन्हा वर काढले. सोमवारी सायंकाळपर्यंत चोरीच्या तीन घटना समोर आल्या असून, त्यामध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. राहुलनगर, मोतीनगर व एमआयडीसी येथील घरे चोरट्यांनी लक्ष्य केलीत.

ठळक मुद्देशहरात खळबळ : राहुलनगर, मोतीनगर, एमआयडीसीत घरे फोडली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात काही दिवस शांतता राहिल्यानंतर चोरट्यांनी आपले डोके पुन्हा वर काढले. सोमवारी सायंकाळपर्यंत चोरीच्या तीन घटना समोर आल्या असून, त्यामध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. राहुलनगर, मोतीनगर व एमआयडीसी येथील घरे चोरट्यांनी लक्ष्य केलीत.बिच्छुटेकडी स्थित राहुलनगर येथे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक खुशाल कांबळे यांच्या घरातून अज्ञात चोरांनी आठ ते दहा लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. कांबळे यांचे मार्डी रोडवर एक घर असून, तेथे त्यांची मुलगी राहते. रविवारी रात्री ते, पत्नी व नात असे तिघे येथे मुक्कामी गेले होते.आवारातच घुटमळले श्वानसोमवारी सकाळी कांबळे यांची १७ वर्षीय नात राहुलनगरातील घरी आली असता, तिला कुलूप तुटलेले व साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे निदर्शनास आले. तिने तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. फे्रजरपुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. कांबळे यांच्या घरातील आलमारीतील २७० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, ३७० ग्रॅमचे चांदीचे दागिने व १५ हजारांची रोख लंपास झाली आहे. एखाद्याने घरावर लक्ष ठेवून चोरी केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. पोलीस श्वान घराच्या आवारातच घुटमळल्याने चोर नेमके कोणत्या दिशेने आले व गेलेत, याबाबत पोलिसांना कळू शकले नाही. एमआयडीसी परिसरातील रहिवासी नितीन भगवंत मोरसे हे रविवारी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. रात्री ते परतले असता, घराच्या दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी घरातील साहित्याची पाहणी केली असता, घरातील सोन्याचे दागिने व २० हजारांची रोख असा एकूण ३५ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या घटनेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.मोतीनगरात भरदिवसा चोरीमोतीनगर येथे मुख्य मार्गावर राहणाऱ्या सुरेखा पडोळे यांच्या घराला चोरट्यांनी सोमवारी सायंकाळी लक्ष्य केले. येथून ७२ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. सायंकाळी अर्धा तासाकरिता त्या कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. फ्रेजरपुराचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी ताफ्यासह घटनास्थळाला भेट दिली. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.